Mangesh Chivate addressing a local teachers' gathering in Pune. His rising political presence marks him as a key player in the upcoming teachers constituency election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP Politics : मुश्रीफांचा खंदा समर्थक विधानपरिषदेत जाण्याच्या तयारीत, अजितदादांना भेटून पुणे पदवीधरची फिल्डिंग लावली

Pune Teachers Constituency : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांनी पुणे शिक्षक मतदारसंघातून तयारी सुरू ठेवली आहे. वास्तविक शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला दीड वर्षाचा कालावधी असला तरी आतापासूनच इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News, 11 Jul : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांनी पुणे शिक्षक मतदारसंघातून तयारी सुरू ठेवली आहे. वास्तविक शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला दीड वर्षाचा कालावधी असला तरी आतापासूनच इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.

महायुतीत ही जागा राष्ट्रवादीला मिळावी यासाठी आतापासूनच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे खंदे समर्थक भैय्या माने यांच्याकडून या उमेदवारीवर दावा केला जात आहे. तसेच ही जागा मिळवण्यासाठी राज्यस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. ही जागा राष्ट्रवादीला मिळाली तर उमेदवारी कोल्हापूरला मिळण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरातून जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी शड्डू ठोकला आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र या निवडणुकीसाठी आहे. या पाच जिल्ह्यांतील 2022 पूर्वी पदवीधर झालेले आणि नोंदणी केलेले मतदारच पात्र असतील. त्यामुळे जुनी नोंदणी रद्द झाली आहे.

5 वर्षांपूर्वी राज्यात त्यावेळची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार होते. या निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आणि विद्यमान आमदार अरुण लाड (सांगली) हे उमेदवार होते. तर शिक्षक मतदारसंघातून जयंत पाटील आसगावकर विजयी झाले.

3 वर्षांपूर्वी राज्यात राजकीय भूकंप होऊन सुरुवातीला शिवसेना व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. शिवसेना एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार असे दोन पक्ष अस्तित्वात आले. सध्या हे दोन्ही पक्ष महायुतीत भाजपसोबत सत्तेत आहेत. विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने महायुतीत ही जागा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा प्रबळ दावेदार समजला जातो.

कागल येथील एका जाहीर कार्यक्रमात या निवडणुकीसाठी भैय्या माने हे उमेदवार असतील, अशी घोषणा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती. त्यानंतर माने यांच्याकडूनही सध्या तरी समाज माध्यमाद्वारे निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. विद्यमान आमदार असल्याने महाविकास आघाडीत ही जागा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला जाण्याची शक्यता आहे.

याशिवाय काँग्रेसकडूनही ही जागा मिळवण्याच्या हालचाली सुरू आहेत; पण राष्ट्रवादी जागेवर ठाम राहिल्यास विद्यमान आमदार अरुण लाड व भैय्या माने यांच्यात लढतीची शक्यता आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी यापूर्वी मतदार म्हणून केलेली नोंदणी रद्द होते.

त्यामुळे नव्याने त्यासाठी नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी 2022 पूर्वी देशातील कोणत्याही विद्यापीठाची पदवीची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्‍यक आहे. सप्टेंबर 2025 पासून मतदार नोंदणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT