Pune Zilla Parishad sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pune zilla parishad Politics : अध्यक्षपद हुकल्यानंतर नवा डाव; सभापती पदासाठी माजी आमदारांची लॉबिंग सुरू

ZP chairman election politics : पुणे महापालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद निवडणकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकहाती सत्ता मिळवण्यात यश आले आहे. आता अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या असून आता सभापती पदासाठी राजकीय रस्सी खेच होताना दिसत आहे.

Sudesh Mitkar

  1. पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने ५१ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे.

  2. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची निवड पूर्ण झाली असून आता सभापती पदासाठी स्पर्धा सुरू आहे.

  3. माजी आमदार आपल्या मुलांना पद मिळावे यासाठी लॉबिंग करत आहेत.

Pune News : पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. एकूण ७३ जागांपैकी ५१ जागा जिंकून पक्षाने भक्कम बहुमत मिळवले आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुका आता पूर्ण झालेल्या आहेत. मात्र, या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर संधी न मिळाल्याने माजी आमदारांच्या मुलांना आता सभापती पदासाठी जोरदार धावाधाव करावी लागत आहे.

महापालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेतही दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येऊन ५१ जागा जिंकल्या होत्या. विजयानंतर अध्यक्षपदासाठी चांगलीच स्पर्धा निर्माण झाली होती. परंतु उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दौंड तालुक्यातील सदस्य वीरधवल जगदाळे यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली. तसेच माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील यांना उपाध्यक्षपद देण्यात आले.

दरम्यान, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचे पुत्र तुषार थोरात (केडगाव-बोरीपारधी गट), माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील-ठाकरे (बावडा गट) आणि भोरचे माजी आमदार काशिनाथ खुटवड यांचे पुत्र विक्रम खुटवड (कामथडी-भोंगवली गट) हे तिघेही अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी दावेदार होते. मात्र, तिघांनाही यश मिळाले नाही.

आता कृषी, बांधकाम, समाजकल्याण आणि महिला-बालकल्याण या चार महत्त्वाच्या समित्यांच्या सभापती पदांच्या निवडणुका २ एप्रिल रोजी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुंबईत ३१ मार्च रोजी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत सभापती पदांच्या वाटपावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे अंकिता पाटील-ठाकरे, तुषार थोरात आणि विक्रम खुटवड यांच्या सभापती पदासाठीच्या धडपडी आता वेगाने सुरू झाल्या आहेत. यातील कोणाची निवड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

FAQs :

1. पुणे जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाला बहुमत मिळाले?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ५१ जागांसह बहुमत मिळाले.

2. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूक पूर्ण झाली का?
हो, दोन्ही पदांच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत.

3. सध्या कोणत्या पदासाठी स्पर्धा सुरू आहे?
सभापती पदासाठी स्पर्धा सुरू आहे.

4. कोणते नेते लॉबिंग करत आहेत?
रमेश थोरात, हर्षवर्धन पाटील आणि काशिनाथ खुटवड हे लॉबिंग करत आहेत.

5. या घडामोडीचा परिणाम काय होऊ शकतो?
पक्षांतर्गत स्पर्धा वाढून राजकीय समीकरणांवर परिणाम होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT