

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळीच माजी मंत्री तानाजी सावंतांना मोठा धक्का बसला होता. निवडणुकीपूर्वीच त्यांचे पुतणे धनंजय सावंत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत ते अपक्ष म्हणून विजयी झाले होते. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत धनंजय सावंत यांनी भाजपला पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर महायुती म्हणून भाजप व एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यानंतर आठच दिवसात जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या समर्थकांनी मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला.
नुकत्याच झालेल्या धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत महायुतीचे वर्चस्व पाहवयास मिळाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या अर्चना पाटील तर उपाध्यक्ष म्हणून शिंदे शिवसेनेच्या (Shivsena) उषा गायकवाड यांची निवड झाली. यावेळी धनंजय सावंत यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता.
बुधवारी मुंबईत भाजप (BJP) प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित धनंजय सावंत यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. धनंजय सावंत यांच्या पत्नी ज्योती सावंत, कन्या, चिरंजीव व त्यांचे बंधू शिवगिरी ऍग्रोचे व्हाइस चेअरमन संजय सावंत यांच्यासह समर्थक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी तुळजापुरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, युवा नेते मल्हार पाटील, माजी जिल्हा अध्यक्ष संताजी चालुक्य, अनिल काळे यांच्यासह नेतेमंडळी उपस्थितीत होते.
धाराशिव जिल्हयात धनंजय सावंत यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे हा माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. सावंत यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याने येत्या काळात परंडा तालुका व धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपची ताकद वाढणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.