अहमदनगर : राज्यात सरकार स्थापन होऊन तब्बल सव्वा महिना उलटल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. मात्र आता राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत ५ ते ७ किंवा जास्तीत जास्त १० आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाऊ शकते. (Shinde Government Cabinet Expansion)
शिंदे गटाकडून सहा आमदारांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यातील बहुतांश मागील सरकारमधील मंत्र्यांना (Minister) पुन्हा संधी मिळणार असल्याचे स्पष्ट आहे. यात आणखी एक विशेष बाब म्हणजे, भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनाही मुंबईहून बोलावण आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईहून निरोप येताच राधाकृष्ण विखे पाटील नगरहून मुंबईसाठी रवाना झाले आहेत. मुंबईला रवाना होण्याआधी त्यांनी शिर्डीत साईबाबांचं दर्शनही घेतल्याचे समजते. त्यामुळे राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याही मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, अशी चर्चा सुरु आहे.
कोण आहेत राधाकृष्ण विखे-पाटील?
राधाकृष्ण विखे-पाटील विधानसभेत शिर्डी मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. फडणवीस सरकार काळात राधाकृष्ण विखे-पाटील विरोधी पक्षनेते होते. जून २०१९ मध्ये, ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस सरकार काळात त्यांनी गृहनिर्माण, परिवहन, शिक्षण मंत्री ही पदं भूषवली आहेत.
त्याचबरोबर नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे गटाकडून माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, माजी कृषीमंत्री दादा भुसे, माजी रोहयो मंत्री संदीपान भुमरे, माजी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा समावेश आहे.
दुसरीकडे, आगामी मुंबई महापालिका निवडणूक पाहता मुंबईतील भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांना पहिल्या यादीत स्थान मिळू शकतं. फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेले आशिष शेलार यांना मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्षपद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण, चंद्रकांत पाटील यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित समजला जात आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.