मोठी बातमी : शिंदे गटाचे सामंत, भुसे, भुमरे, सत्तार, देसाई होणार मंत्री; भाजपकडून लोढांना संधी

शिंदे गटाकडून सहा आमदारांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Eknath Shinde Group's MLA
Eknath Shinde Group's MLASarkarnama
Published on
Updated on

मुंबई : गेल्या महिनाभरापासून होणार होणार अशी चर्चा असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारास (Cabinet expansion) अखेर मुहूर्त मिळाला असून येत्या दोन दिवसांत तो होणार असल्याचे स्पष्ट झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात यासंदर्भात बैठक झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शिंदे गटाकडून सहा आमदारांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यातील बहुतांश मागील सरकारमधील मंत्र्यांना (Minister) पुन्हा संधी मिळणार असल्याचे स्पष्ट आहे. (Samant, Bhuse, Bhumre, Sattar, Desai of Shinde group will be ministers; Opportunity for Lodha from BJP)

नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे गटाकडून माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, माजी कृषीमंत्री दादा भुसे, माजी रोहयो मंत्री संदीपान भुमरे, माजी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा समावेश आहे.

Eknath Shinde Group's MLA
मीच पक्षाचा अध्यक्ष; नाराज कोणावर होणार? अजितदादांच्या निवडीबद्दलच्या चर्चेवर जयंत पाटलांचे स्पष्टीकरण!

दुसरीकडे, आगामी मुंबई महापालिका निवडणूक पाहता मुंबईतील भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांना पहिल्या यादीत स्थान मिळू शकतं. फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेले आशिष शेलार यांना मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्षपद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण, चंद्रकांत पाटील यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित समजला जात आहे.

Eknath Shinde Group's MLA
शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला; निवडणूक आयोगात आजपासून राजकीय नाट्याचा दुसरा अंक सुरु

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विरोधी पक्षांकडून शिंदे-फडणवीस यांना याच कारणावरून टीकेचे धनी व्हावे लागत आहे. मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलेल्या टीकेनंतर घूमजाव करण्यात आले. तसेच, राज्याच्या काही भागात होत असलेली अतिवृष्टी पाहता पालकमंत्र्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची गरज असताना पालकमंत्रीच नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांनी दिल्लीवरून आल्यानंतर आज सकाळी नंदनवन बंगल्यावर एक बैठक घेतली. त्यात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी त्यांनी दिल्लीतून पक्षश्रेष्ठींकडून परवानागी आणल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com