Ahmednagar Political News : भंडारा उधळला म्हणून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी धनगर कार्यकर्त्यास मारहाण केली होती. यामुळे विखेविरोधात समाजात रोष निर्माण झाला होता. आता खुद्द विखेंनी धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी लावून धरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे हा प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. यातून धनगर समाजाविरोधात झालेली प्रतिमा पुसण्याचे काम विखे करत असल्याची चर्चा आहे. (Latest Political News)
धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडण्यासाठी आपण प्रयत्नशील असून, त्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची विखे पाटील यांनी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. धनगर समाज संघर्ष समिती आणि मेंढपाळ विकास मंच यांच्या शिष्टमंडळाने वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री विखे पाटील यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन विखे पाटील यांना दिले.
दरम्यान, शिष्टमंडळाशी सविस्तर प्राथमिक चर्चा करून विखे पाटील यांनी विषय समजून घेतले. तसेच लवकरच याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर करीत आश्वस्थ केले. या वेळी खासदार डॉ. विकास महात्मे, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वीच म्हसवड मध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचा धनगर समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. म्हसवड नगरपालिकेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राधाकृष्ण विखे यांना धनगर समाजाची पारंपरिक घोंगडी, डोक्यावर फेटा आणि हातात काठी असा धनगरी समाजाचा वेश त्यांनी केला होता. धनगर समाजामध्ये निर्माण झालेला असंतोष कमी करण्यासाठी आपण धनगर आरक्षणाविरोधात नसल्याचा विखे यांच्या वतीने प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.