Pandharpur Kartiki Ekadashi : कार्तिकी पूजेचा मान उपमुख्यमंत्री फडणवीस, की अजितदादांना ? मंदिर समितीचा 'हा' निर्णय

Deputy CM Devendra Fadnavis & Ajit Pawar : दोनपैकी कोणाही उपमुख्यमंत्र्यांची नाराजी ओढवून घेणे मंदिर समितीसाठी नक्कीच परवडणारे नाही.
Deputy CM Devendra Fadnavis & Ajit Pawar
Deputy CM Devendra Fadnavis & Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur News : वर्षानुवर्षे पंढरपूरला आषाढी एकादशीला मुख्यमंत्री, तर कार्तिका एकादशीला उपमुख्यमंत्र्यांसह मानाच्या वारकरी दाम्पत्याला पूजेचा मान मिळतो अशी परंपरा आहे. पण यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट शिंदे - फडणवीस सरकारमध्ये सामील झाला.

यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, पण आता पंढरपूरला कार्तिकी एकादशीला पूजेचा मान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना, की उपमुख्यमंत्री अजित पवारांना मिळणार यावरून नवा पेच निर्माण झाला आहे.

यंदा कार्तिकी एकादशी 23 नोव्हेंबर रोजी आहे. या एकादशी सोहळ्याच्या तयारीसाठीची मंदिर समितीची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेचा मान उपमुख्यमंत्री फडणवीस की पवार यांच्यापैकी कुणाला दिला जाणार, याविषयी अद्याप निश्चित निर्णय समोर आलेला नाही.

Deputy CM Devendra Fadnavis & Ajit Pawar
Ajit Pawar News : अजितदादा पुण्याचे पालकमंत्री झाल्यावर बावनकुळे म्हणाले, "जे ठरलं होतं तेच झालं..."

मंदिर समितीसमोर कार्तिकी एकादशीला नेमक्या कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना शासकीय पूजेला निमंत्रण द्यायचे, यावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. यासाठीच समितीने मध्यम मार्ग काढत अखेर विधी व न्याय विभागाचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील वर्षी कार्तिकीच्या पूजेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या हस्ते पार पडली होती. पण आता राज्याला दोन उपमुख्यमंत्री असल्याने या शासकीय पूजेचा मान कोणाला द्यायचा, या कचाट्यात मंदिर समिती अडकली आहे. या पूजेवरून मानापमान नाट्य रंगण्याची शक्यता आहे. दोनपैकी कोणाही उपमुख्यमंत्र्यांची नाराजी ओढवून घेणे मंदिर समितीसाठी नक्कीच परवडणारे नाही. यामुळे समितीने सावध भूमिका घेतली आहे.

मंदिर समिती ही विधी विभागाच्या सल्ल्यानंतर यंदाच्या कार्तिकी एकादशीला मानाच्या वारकऱ्यांसोबत उपमुख्यमंत्री फडणवीस, की अजित पवार (Ajit Pawar) यांपैकी कोणाला पूजेचा मान द्यायचा हा निर्णय घेणार आहे.

मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, आम्हाला दोन्ही उपमुख्यमंत्री तितकेच महत्त्वाचे आणि मानाचे आहेत. त्यामुळे कार्तिकी महापूजेचे निमंत्रण विधी व न्याय विभाग जो निर्णय देईल, त्यानंतर दिले जाईल. (Pandharpur News)

(Edited By Deepak Kulkarni)

Deputy CM Devendra Fadnavis & Ajit Pawar
Arvind Kejriwal and Sharad Pawar: अरविंद केजरीवाल अन् शरद पवारांना एकाच दिवशी दिल्लीत दणका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com