अहमदनगर - महाराष्ट्र सरकारने किराणा दुकानांत वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयावर राज्यातील भाजप व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यात भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केला आहे. ( Radhakrishna Vikhe Patil said, big corruption in the sale of wine ... )
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बांधण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाच्या उद्घाटनासाठी विखे पाटील आले असता पत्रकारांशी बोलत होते. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, की राज्य शासनाने वाइनविक्रीला खुलेआम परवानगी दिली असून, यात फार मोठा भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता आहे. हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी आमदार विखे पाटील यांनी केली.
ते पुढे म्हणाले, की वाइन व दारू ही शारीरिकदृष्ट्या योग्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगणे, यासारखे दुर्दैव कोणते आहे? दारू असो की वाइन, शेवटी ती शरीराला घातकच आहे. तरीदेखील या शासनाने किराणा दुकानांत वाइनविक्रीला परवानगी देण्यामागे काही तरी गौडबंगाल असण्याची दाट शक्यता आहे.
या शासनाने लोकांच्या भावनांशी खेळण्याचा उद्योग सुरू केलेला आहे. लोकांची श्रद्धास्थाने असणारी मंदिरे बंद करून मदिरालये सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यासारखे दुर्दैव ते कोणते? या आघाडी सरकारने कुणालाच न्याय दिलेला नाही. शेतकरी, उद्योजक, व्यावसायिक कोविडमुळे बेरोजगार झालेले आहेत. आता किराणा दुकानांत वाइनविक्रीला परवानगी देऊन काय साध्य केले? केवळ संबंधितांशी हातमिळवणी करून यात मोठा भ्रष्टाचार झाला असावा. त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा, अशी भाजपची मागणी आहे, असे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.