Radhakrishna Vikhe Patil, Ram Shinde News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil News : राम शिंदेंच्या आरोपांवर विखे-पाटील स्पष्टच बोलले; पक्षनेतृत्वाकडे आम्हीही आमची भूमिका मांडू...

Ahmadnagar Politics : हा पक्षाअंतर्गत विषय लोकांमध्ये येणे योग्य नाही

सरकारनाम ब्यूरो

Ram Shinde, Radhakrishna Vikhe Patil News : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडणूक आज (ता. १६) पार पडली. या निवडीमध्येही दोन्ही गटाला सम-समान जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर सभापती आणि उपसभापती पदासाठी ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्यानंतर नगरमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले आहे.

या मध्ये सभापती पद आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्या गटाकडे गेले. तर उसभापतीपद हे आमदार रोहित पवार यांच्या गटाकडे गेले. या निवडणुकीनंतर भाजप नेते राम शिंदे यांनी राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि भाजपाचे (BJP) खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

त्या आरोपांना राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले. विखे पाटील म्हणाले, ''राम शिंदे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा काही गैरसमज झाला असले. त्यांच्याशी मी स्वत: बोलेल त्याचे काही समज-गैरसमज असतील तर त्यांनी माझ्याशी चर्चा करायला काहीच हरकत नव्हती. थेट माध्यमांशी बोलने योग्य नाही. त्या संदर्भात मी त्यांच्याशी स्वता: संपर्क करेल, त्यांच्याशी चर्चा करेल, त्यांना कुणी चुकीची माहिती दिली. तो पक्षाअंतर्गत विषय आहे, तो एकत्र बसून सोडवू''

''पक्ष नेतृत्वाकडे त्यांनी जी काही तक्रार केली असले त्या संदर्भात आम्ही आमची भूमिका मांडू, शेवटी हा पक्षाअंतर्गत विषय आहे. तो लोकांमध्ये येणे योग्य नसल्याचे'' विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.

राम शिंदे काय म्हणाले होते ''बाजार समितीमध्ये भाजपाचा सभापती झाला. भाजपाच्या स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलच्या ताब्यात बाजार समिती आली आहे. खासदारांचे आणि पालकमंत्र्यांचे सहकार्य अपेक्षीत होते. मात्र, ते मिळाले नाही. त्यांचे एक पीए आणि बंधु यांनी विरोधात अर्ज भरला. एक कार्यकर्ता होता तोही विरोधात गेला. आम्ही उमेदवारी देतो म्हणून सांगितले. मात्र, पहिल्या दिवसांपासून आमच्या भूमिकेला विरोध करण्याची भूमिका त्यांनी घेतली.''

''शेवटच्या टप्प्यात देखली सहकार्य करतो असे सांगितले. मात्र, सहकार्य मिळालेच नाही. आज त्यांनी आमच्या विरोधात उपसभापती पदासाठी अर्ज भरला. आमच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम केले. एवढ्या मोठ्या शक्तीच्या पवारांच्या विरोधात निवडणूक लढली. जिल्हा बॅकेच्या संचालकाच्या विरोधात लढली. खासदारांच्या विरोधात लढली. भाजपाने खासदार केले, आमदार केले, मंत्री केले. दुसऱ्या क्रमाकांचे पद दिले. मी हा विषय नेतृत्वाच्या कानावर घालणार असल्याचेही'' राम शिंदे यांनी यावेळी सांगितले होते.

''विखे पाटील ४० वर्ष ज्या पक्षात होते, त्या पक्षाने त्यांना जे दिले नाही, ते भाजपाने दिले. खासदार झालेत, आमदार झालेत, मंत्री झालेत. पण मंत्री कोणते झालेत तर महसुल मंत्री. अशा परिस्थितीमध्ये मला वाटल नाही ते असे करतील. मात्र, प्रत्यक्षात आता मी ते अनुभवतो आहे. ज्या पक्षात राहतात त्याच पक्षाला विरोध करायचा हे आज देखील त्यांचे चालू आहे. मात्र, हा काँग्रेस नाही, तर भाजपा आहे, हे त्यांनी लक्षात घेण्याची आवश्यकता,'' असल्याचेही राम शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT