Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, देशद्रोही मंत्र्यांची पाठराखण करण्‍यासाठी मंत्रीच रस्‍त्‍यावर...

विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. या प्रसंगी ते बोलत होते.

अमित आवारी

अहमदनगर - आश्वी बुद्रूक येथे अहमदनगर जिल्‍हा परिषद शाळेच्‍या नुतन इमारतीचे उद्धाटन आणि सुमारे 2 कोटी 67 लाख रुपयांच्‍या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. या निमित्‍ताने आयोजित केलेल्‍या कार्यक्रमात आमदार विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना जिल्‍ह्यातील तीनही मंत्र्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडून दिले असल्‍याचा आरोप केला. तसेच राज्यात महाविकास आघाडीतर्फे आज करण्यात येत असलेल्या आंदोलनांवर आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली. ( Radhakrishna Vikhe Patil said, the minister is on the road to pursue the traitorous ministers ... )

ज्येष्‍ठनेते शाळीग्राम होडगर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या या कार्यक्रमास जिल्‍हा परिषदेच्‍या शिक्षण समितीचे राजेश परजणे, जिल्‍हा परिषद सदस्‍या अॅड. रोहिणी निघुते, प्रवरा बॅंकेचे अध्यक्ष अशोकराव म्‍हसे, पंचायत समिती सदस्‍य निवृत्‍ती सांगळे, दीपाली डेंगळे, विखे पाटील कारखान्‍याचे संचालक रामभाऊ भुसाळ, कैलास तांबे आदी उपस्थित होते.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सरकारच्‍या फक्‍त घोषणाच सुरू आहेत. एक मंत्री महिलेने आत्‍महत्‍या केली म्‍हणून घरात बसला, गृहमंत्री 100 कोटी रुपयांच्‍या वसुलीमध्‍ये जेलमध्‍ये गेले. आतातर एका मंत्र्याचे थेट दहशतवाद्यांशी आर्थिक संबंध उघड झाले तरी या आघाडी सरकारला कोणतीही शरम नाही. देशद्रोही मंत्र्यांची पाठराखन करण्‍यासाठी मंत्रीच रस्‍त्‍यावर उतरायला लागले. हे राज्‍याचे दुर्दैव असल्‍याचे आमदार विखे पाटील यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात राज्‍याची मोठी पिछेहाट झाली आहे. अहमदनगर जिल्‍ह्याला तीन मंत्रीपदे मिळूनही संकटाच्‍या काळात कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. या सरकारच्‍या काळात शेतकरी व सर्वसामान्‍य माणूस देशोधडीला लागला. मराठा ओबीसी समाजाचे आरक्षणही गेले. या सर्व पापाचे प्रायश्चित्य आघाडी सरकार घेणार का? असा प्रश्न आमदार विखे पाटील यांनी उपस्थित केला.

कोरोना संकटकाळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसामान्‍यांसाठी प्रभावी योजना राबविल्यामुळेच या देशातील जनता सुरक्षित राहिली. मोफत लसीकरण आणि मोफत धान्‍य याचा मोठा आधार सामान्‍य माणसाला केंद्र सरकारने दिला. शेतकरी, कामगार, महिला यांच्‍यासाठी विविध योजना सुरू केल्‍यामुळेच हा देश आत्‍मनिर्भरतेकडे जात असल्‍याचे त्‍यांनी आवर्जुन नमुद केले.

राज्य सरकारवर टीका करताना आमदार विखे पाटील म्‍हणाले की, कोविड संकटकाळात कोणतीही मदत समाज घटकाला हे सरकार करु शकलेले नाही, सरकार फक्‍त फेसबुकवर दिसत होते. केवळ केंद्राकडे बोट दाखवून मदतीची अपेक्षा करीत राहिले. आघाडी सरकारच्‍या अडीच वर्षांच्‍या काळात राज्‍ विकासापासून मागे गेले आहे.

रयत शिक्षण संस्थेचा राजकीय वापर

संगमनेर तालुक्‍यातील गावांचा समावेश शिर्डी विधानसभा मतदार संघात झाल्‍यानंतर या भागामध्‍ये सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. याभागामध्‍ये सर्व काही आम्‍हीच करतो असे भासविण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. मात्र ही गावे शिर्डी मतदार संघात येण्‍पूर्वी लोकांना चालायलाही रस्‍ते नव्‍हते. तेव्‍हा तुम्‍ही कुठे होतात. कोरोना संकट काळात कार्यकर्त्‍यांच्‍या सहकार्याने मदतीचे काम मोठ्या प्रमाणात केले. कोरोना संकट लक्षात घेवून मराठा ओबीसी समाजातील विद्यार्थ्‍यांची 50 टक्‍के फी माफ करण्‍याचा निर्णय प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेने घेतला. आज अनेकजण या भागात येवून फिरत आहेत, त्‍यांना हे का सुचले नाही? या भागात रयत शिक्षण संस्‍थेचेही महाविद्यालय आहे. मात्र फक्‍त या संस्‍थेचा राजकीय वापर सुरु आहे. काहींना सध्‍या पाहुण्‍यांचा कळवळा खुप आला आहे, असा टोला लगावून आमदार विखे पाटील यांनी लगावला.

सत्तेचा उन्माद चांगला नसतो

वाळू माफीयांनी या भागात उच्‍छाद मांडला आहे. सत्‍तेचा उन्‍माद चांगला नसतो. विकास कामांना अडथळे आणू नका, आश्‍वी पोलिस ठाण्‍याच्‍या हद्दीतील गावे संगमनेर तालुका पोलिस ठाण्‍यात समाविष्ट करुन दबाव निर्माण करण्‍याचे काम करीत आहेत. आश्‍वी येथील महाविद्यालयाला सुध्‍दा विरोध करणारे येथील विकासाची घडी मोडण्‍यासाठी आता आले आहेत अशी टीका आमदार विखे पाटील यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT