Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil Paresh Kapse
पश्चिम महाराष्ट्र

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, 12वीच्या प्रश्नपत्रिका जाळल्‍या की, जळाल्या?

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात पुणे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12 वीच्या प्रश्नपत्रिका जळाल्या. या घटनेवरून भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी महाविकास आघाडीला ( Mahavikas Aghadi ) टीकेचे लक्ष्य केले. ( Radhakrishna Vikhe Patil said, whether the question papers of 12th class were burnt or not ... )

प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, दहावी आणि बारावीच्‍या प्रश्‍नपत्रिका घेवून जाणाऱ्या टेम्‍पोला लागलेल्‍या आगीची घटना अतिशय गंभीर आहे. प्रश्‍नपत्रिका जाळल्‍या की, जळाल्‍या याची उच्‍चस्तरीय चौकशी करण्‍त यावा अशी मागणी राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात भरती प्रक्रियेसाठी कोणतीही परीक्षा पारदर्शकपणे होवू शकलेली नाही. सर्वच परीक्षांच्या प्रश्‍नपत्रिका फुटण्‍याचे प्रकार वारंवार घडल्‍याने या सरकारच्‍या काळात सर्वच परीक्षा संशयाच्‍या भोवऱ्यात अडकल्‍या आहेत. दहावी बारावीच्‍या परीक्षा तोंडावर आल्‍या असताना प्रश्‍नपत्रिका घेवून जाणाऱ्या टेम्‍पोला लागलेल्‍या आगीची घटना अतिशय गंभीर असल्‍याकडे त्‍यांनी लक्ष वेधले.

काल परीक्षा महामंडळाने तांत्रिक कारण सांगून परीक्षेच्या तारखा पुन्‍हा नव्‍याने जाहीरही करुन टाकल्‍या. मात्र यातील नेमके तांत्रिक कारण कोणते? असा प्रश्‍न अनुत्‍तरीतच राहतो. प्रश्‍नपत्रिका जळाल्‍या की, जाळल्‍या याबाबत कोणताही खुलासा परीक्षा महामंडळ करु शकलेले नाही. त्‍यामुळे या घटनेची उच्‍चस्‍तरीय चौकशी करावी.

एकीकडे कोरोना संकटाने सर्वाधिक नुकसान शिक्षण क्षेत्राचे झाले आहे. राज्य सरकार स्‍वत:चेच निर्णय मागे घेत राहिले. शाळा सुरु करण्‍यापासून ते दहावी, बारावीच्‍या परीक्षांच्या बाबतीतही सरकार ठाम राहिले नाही. आघाडी सरकारचा कारभार हा पूर्णत: गोंधळलेला आहे. सरकारच्‍या निर्णयातील धरसोड वृत्‍तीच विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढवत असल्‍याची टीका आमदार विखे पाटील यांनी केली.

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्‍याच्‍या महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांकडून होत असलेल्‍या आरोपाचा इन्‍कार करुन, आमदार विखे पाटील म्‍हणाले की, केवळ आपले अपयश झाकण्‍यासाठी असे आरोप केले जात आहेत. भ्रष्‍टाचाराची प्रकरण उघड होतील अशी भीती असल्‍यानेच जनतेचे लक्ष विचलीत करण्‍याचे काम महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांकडून होत असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केली.

काँग्रेस भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेली

आघाडी सरकारमधील काँग्रेसच्‍या सहा मंत्र्यांच्‍या खात्‍यांमध्‍ये होत असलेल्‍या संभाव्‍य बदल्यांच्‍या चर्चेवर भाष्‍य करताना विखे पाटील यांनी काँग्रेसला आपली प्रतिमा सुधारायची असेल तर, आघाडी सरकारमधून बाहेर पडले पाहिजे. मात्र भ्रष्‍टाचाराच्‍या विळख्‍यात ते अडकले आहेत. मंत्री राहिलो तर संरक्षण मिळेल आणि सत्‍तेतून बाहेर पडलो तर बेड्या पडतील अशी भीती त्‍यांना सतावत असल्‍यानेच ते होणे शक्‍य नाही. त्‍यामुळे काँग्रेसच्‍या भवितव्‍याची कोणालाही चिंता नसल्‍याचा टोला त्‍यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT