Radhakrishna Vikhe, Rohit Pawa Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe : रोहित पवारांना घेरण्यासाठी राधाकृष्ण विखेंचा असा असणार 'ट्रॅप...'

Pradeep Pendhare

Ahmednagar Political News : तलाठीभरती परीक्षेची पहिली गुणवत्ता यादी लागल्यानंतर पुन्हा गैरप्रकाराचे आरोप झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी या भरतीप्रक्रियेवर आर्थिक व्यवहारांचे आरोप केले. यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंनी कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचे सांगितले. तसेच रोहित पवारांनी केलेल्या बदनामीवर कायदेशीर मत मागवले. ते येताच निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे, अशीही सूचना केली. मंत्री विखेंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आमदार पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

पहिली गुणवत्ता यादी लागताच तलाठी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी होऊ लागल्या. राजकीय नेत्यांनी या भरतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आमदार रोहित पवारांनी ३० ते ३५ लाख रुपये घेतल्याचा थेट आरोप केला. राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवारांनीही याबाबत गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांची महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी विशेषकरून आमदार पवारांनी केलेल्या आर्थिक आरोपांवर संताप व्यक्त केला.

रोहित पवारांनी (Rohit Pawar) केलेल्या आरोपांवर विखे म्हणाले, असे आरोप करून सरकार आणि विभागाची आमदार पवारांनी बदनामी केली आहे. याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार आहे, असे सूतोवाच विखेंनी केले. महायुतीच्या मेळाव्याच्या आढावा बैठकीसाठी मंत्री विखे नगरमध्ये होते. त्यावेळी त्यांनी पुन्हा तलाठीभरती प्रक्रियेवर आमदार पवारांनी केलेल्या आरोपांवर कायदेशीर कारवाई करण्याचे भाष्य केले. त्यामुळेआगामी काळात पवारांना अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

मंत्री विखे म्हणाले, 'लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. बेछूट आणि बेताल आरोप करण्याची ही परिसीमा झाली. आव्हान देतो, एक प्रकरण समोर आणून द्या. भरतीत ३० लाख रुपयांचा बेछूट आरोप केला आहे. या आरोपांवर आम्ही कायदेशीर मार्गदर्शन मागवले आहे. कागदपत्र गोळा करीत आहोत. आम्ही व्हेग मार्गाने परीक्षा घेतलेल्या नाहीत. परीक्षेत पूर्ण पारदर्शकता आहे.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पवारांवर पलटवार करताना Radhakrishna Vikhe विखेंनीही काही आरोप केले. ते म्हणाले, त्यांनी स्वतःच्या कारभाराकडे पाहिले पाहिजे. कारभाराचे काय दिवाळे निघाले आहे? जनतेच्या पैशाची लूट कशी केली आहे? याचा हिशोब द्यायला पाहिजे. तो 'ईडी'च्या कारवाईत समोर येईलच. आमदार पवारांनी ज्या पद्धतीने भरतीच्यासंदर्भात आरोप केले आहेत, त्यातून विभागाची आणि सरकारची बदनामी झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे. 'ईडी'च्या कारवाईकडून दुर्लक्ष करण्यासाठी हे आरोप आमदार पवार करीत असावे,' असेही विखे म्हणाले.

सत्यजीत तांबेंना सकारात्मक प्रतिसाद

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबेंनी पेपरफुटी रोखण्यासाठी राज्यात कडक कायदा व्हावा, अशी मागणी लावून धरली आहे. यावर मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, 'तलाठीभरती खूप पारदर्शकपणे पार पडली आहे. यातील कोणत्याच यंत्रणेने गैरमार्गाचा अवलंब केलेला नाही. राज्यात पेपरफुटी रोखण्यासाठी आणि भरतीत पारदर्शकता येण्यासाठी या मागणीचे स्वागत केले पाहिजे.'

विधानसभेचे विरोधी पक्षनेता विजय वड्डेटीवार यांनी संपूर्ण परीक्षेवर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे. या मागणीचेदेखील स्वागत करतो. श्वेतपत्रिका काढण्याची कोणालाच अडचणी नसल्याचेही मंत्री विखे म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT