Ramdas Athwale : राम मंदिरावरून रामदास आठवलेंचा काँग्रेसवर घणाघात; म्हणाले...

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याची काँग्रेसला ॲलर्जी
Ramdas Athwale
Ramdas AthwaleSarkarnama
Published on
Updated on

Ayodhya Ram Temple News : अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याकडे पाठ फिरवल्यानंतर केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसनेत्यांचा कडक शब्दांत समाचार घेतला आहे. अयोध्येतील सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मात्र काँग्रेसला मोदींच्या चेहऱ्याची ॲलर्जी आहे. त्यामुळे काँग्रेस या सोहळ्यापासून लांब राहत असल्याचा आरोप आठवलेंनी केला.

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, अधीररंजन चौधरी अनुपस्थित राहणार आहेत. काँग्रेसने हा कार्यक्रम भाजप आणि आरएसएसचा असल्याचाही आरोप केला होता. त्यांनी घेतलेल्या या भूमिका देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. यावर केंद्रीयमंत्री आठवलेंनी (Ramdas Athwale) काँग्रेसवर जोरदार आगपाखड केली.

Ramdas Athwale
Shivsena UBT : निकालानंतर ठाकरे गटात वाद पेटला; 'या' मुद्द्यावरून थेट उद्धव ठाकरेंनाच जाब विचारला

'काँग्रेसनेत्यांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) चेहरा पाहणे योग्य वाटत नाही. त्यामुळेच ते सोहळ्यापासून दूर राहणे पसंत करत असल्याचा टोला आठवलेंनी लागावला आहे. तसेच हा भाजप किंवा आरएसएसचा कार्यक्रम नसून राममंदिर ट्रस्टचा आहे. मात्र सोहळ्यापासून लांब राहण्यासाठीच काँग्रेस तसा बहाणा करत आहे,' असेही आठवलेंनी सांगितले.

'पुरातत्त्व विभागाच्या मुस्लिम अधिकाऱ्याने केलेल्या उत्खननात अयोध्येतील राम मंदिरस्थळी पुरावा आढळले होते. सर्वोच्च न्यायालयाने या विषयी निर्णय दिला आहे. तसेच हिंदू समाजाच्या भावनांचा विचार करूनच अयोध्येत राम मंदिर निर्माण होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे,' याची आठवणही यावेळी आठवलेंनी करून दिली.

काँग्रेसला बोलाविण्याची गरजच नव्हती

निमंत्रणानंतर काँग्रेसने अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याकडे पाठ फिरवली. यामुळे आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसला या सोहळ्यात बोलाविण्याची गरजच नव्हती, असे स्पष्ट मत नोंदविले. 'विश्व हिंदू परिषदेने काँग्रेसला अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रित करीत सुवर्णसंधी दिली होती. काँग्रेसने मात्र या संधीची माती केली. काँग्रेसने सुधारणा न करता पुन्हा चूक केली,' असा दावाही हिंमत बिस्वा सरमा यांनी केला.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Ramdas Athwale
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : '...हाच आहे ठाकरे अन् शिंदेंमधला मोठा फरक !'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com