Sharad pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics: दाजींनंतर मेहुण्यानं घेतली शरद पवारांची भेट; उमेदवारी कुणाला मिळणार?

Rahul Gadkar

Radhanagari News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आजपासून चार दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. पंचशील हॉटेलवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

अजित पवार गटातून बाहेर पडलेले माजी आमदार के.पी पाटील यांनी पवार यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा राजीनामा दिलेले ए. वाय. पाटील हेही शरद पवार यांना भेटले. के.पी. पाटील हे ए.वाय. पाटलांचे दाजी आहेत.'मेहुणे-पाहुणे'यांनी घेतलेली पवारांची भेट कोल्हापुरकरांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे.

दोन्हीही 'मेहुणे-पाहुणे' राधानगरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. आघाडीकडून उमेदवारी मिळण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. त्यासाठी त्यांनी 'फिल्डिंग' लावल्याची माहिती आहे. 'राधानगरी'साठी महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून प्रचंड चुरस असल्याचे चित्र आहे.

'के.पी' आणि 'ए.वाय' हे एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले दोन्ही नेते अजित पवार गटात होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांना अजित पवार यांची साथ सोडली आहे. आघाडीकडून तिकीट मिळवण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये चुरस पाहायला मिळते.

शरद पवार शब्द पाळणार?

"मी गेली दहा वर्ष राधानगरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. मात्र दोन वेळा मला शरद पवार साहेबांनी थांबायला सांगितले.त्यांच्या शब्दाला मान देऊन मी निवडणूक लढवायचा थांबलो. पण आता शरद पवार यांच्या आशीर्वादामुळे मी ही विधानसभा निवडणूक लढवणार आहे, ते मला उमेदवारी देतील," असे शरद पवार यांच्या भेटीनंतर ए वाय पाटील यांनी सांगितले.

मेहुणा की दाजी

राधानगरी भुदरगड विधानसभा मतदरासंघातून दोघांनाही निवडणूक लढवायची आहे. शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर हे सध्या येथे विद्यमान आमदार आहेत. महायुतीच्या जागावाटपच्या सूत्रानुसार ही जागा पुन्हा शिंदे गटाच्याच वाट्याला जाऊ शकते. त्यामुळे आता ए.वाय. पाटील आणि के.पी. पाटील यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT