K.P. Patil: महायुतीने तिकीट नाकारलेले माजी आमदार शरद पवारांच्या भेटीला

Radhanagari Assembly Election K.P. Patil meeting Sharad Pawar:के. पी. पाटील हे राधानगरी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. महायुतीतील उमेदवारी मिळत नसल्याने के. पी. पाटील यांच्याकडे महाविकास आघाडीचा पर्याय शिल्लक राहिला आहे.
 K.P. Patil meeting Sharad Pawar
K.P. Patil meeting Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

विधानसभा निवडणूक दोन महिन्यावर येऊन ठेपली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी आमदार के. पी. पाटील हे देखील महायुतीला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. ते ठाकरे गटात जाण्यास इच्छुक आहेत. महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) उमेवारी मिळवण्यासाठी त्यांनी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांना भेटण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केली आहे. महायुतीचे नेते माजी पवार ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत त्या ठिकाणी आमदार के.पी. पाटील आज सकाळीच पोहचले आहेत. आघाडीकडून उमेदवारी मिळावी, याबाबत ते पवारांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

 K.P. Patil meeting Sharad Pawar
Katol Assembly Election: डझनभर इच्छुक! पण अजितदादांच्या मनात दुसराच उमेदवार? 'विजयगड'वर खलबतं

के. पी. पाटील हे राधानगरी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. महायुतीतील उमेदवारी मिळत नसल्याने के. पी. पाटील यांच्याकडे महाविकास आघाडीचा पर्याय शिल्लक राहिला आहे.

महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांकडे त्यांनी उमेदवारी मागितली आहे. हा मतदारसंघ शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे.के.पी.पाटलांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळणार हे निश्चित झाल्याची चर्चा आहे.

के. पी. पाटील हे महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांकडे उमेदवारीची मागणी करत आहेत. राधानगरीची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता असल्याने के. पी. पाटील शिवसेनेचा रस्ता निवडणार असल्याचं सांगितले जात आहे.

पूर्वी मातोश्रीवर शिवसैनिकांनी निनावी पत्र लिहित के पी पाटील यांच्या विरोधात तक्रार केल्या आहेत. उपरा नको, निष्ठावंत शिवसैनिक द्या! अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे. शिवाय के पी पाटील यांनी शिवसेनेच्या विरोधात काय काय केलं? याचा दाखला त्या पत्रात दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com