Raghunathdada Patil Sarakarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raghunath Dada Patil on Raju Shetti 'स्वतःच्या स्वार्थासाठी शेतकरी चळवळीचा घात केला' ; राजू शेट्टींवर रघुनाथदादांचा हल्लाबोल!

Rahul Gadkar

Raghunath Dada Patil On Swabhimani Shetkari Sanghatana News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी घणाघात केला आहे.

लोकसभा निवडणुकीतील शेट्टी यांची भूमिका आणि सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सुरू असलेली चलबिचल यावरून रघुनाथ पाटील यांनी शेट्टी यांचा समाचार घेतला आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी राजू शेट्टी यांनी शेतकरी चळवळीचा घात केला आहे असा घणाघात रघुनाथदादा पाटील यांनी केला आहे. कोल्हापुरात ते बोलत होते.

पाटील पुढे म्हणाले, 'माजी खासदार राजू शेट्टी(Raju Shetti ) यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी शेतकरी चळवळीचा घात केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना आता विधानसभेचे डोहाळे लागलेत. त्यातूनच त्यांनी तिसर्‍या आघाडीची मोट बांधण्यास प्रारंभ केलाय. पण त्यांचा हा प्रयोग यशस्वी होणार नाही.', अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली.

लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदार संघात स्वबळावर लढलेल्या शेतकरी नेते राजू शेट्टी यांना पराभवाला सामोरे जावे लागले . यामुळे शेतकरी चळवळीची पीछेहाट झाल्याची टीका त्यांच्यावर होऊ लागली. राजू शेट्टी यांच्या वारंवार बदलत्या राजकीय भूमिकेवरही अनेकांनी टीका केली आहे.

आता राजू शेट्टी विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यासाठी लहान-लहान घटक पक्षांना एकत्र घेऊन ते तिसर्‍या आघाडीची मोट बांधू बांधण्याच्या प्रयत्नात आहेत . त्यांच्या या भूमिकेचा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील(Raghunath Dada Patil) यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे.

शेतकरी नेते शरद जोशी यांचा विश्वासघात करुन, राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन केली आणि या संघटनेचं त्यांनी मोठ्या प्रमाणावर राजकारण केलंय, अशी टीका रघुनाथदादा पाटील यांनी केली.

आपली शेतकरी संघटना मात्र नेहमीच शेतकरी हितासाठी प्रस्थापित व्यवस्थेविरोधात संघर्ष करत राहील, असंही रघुनाथदादा पाटील यांनी स्पष्ट केलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT