Raju Shetti, Raghunath Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sugarcane FRP : रघुनाथदादांचा राजू शेट्टींवर 'आसूड' ; 'एफआरपी'चा कायदा शेतकऱ्यांच्या मुळावर...

सरकारनामा ब्यूरो

- अनिल कदम

Sugarcane FRP : ऊस आणि ताग उत्पादकांसाठी 'एसएमपी' आणली होती. जर याप्रमाणे दर न दिल्यास कारखान्यावर फौजदारी करता येऊ शकत होती. मात्र, हा कायदा रद्द करण्यासाठी शेतकरी संघटनेत फूट पाडून स्वाभिमानीची निर्मिती झाली. राजू शेट्टी यांना हाताशी धरून 'एफआरपी'चा कायदा आणण्यात आला. एफआरपीचा कायदा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना तीन हजारापेक्षा अधिक दर मिळत नाही, याला पूर्णपणे राजू शेट्टीच जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. रघुनाथ पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जुना कारखाना म्हणजे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखाना होय. या कारखान्याने दरवर्षी टनाला दिलेला भाव याचा एक चार्टच शेतकऱ्यांना दिला आहे.

या चार्टवर जर मागच्या 50 वर्षांपासूनचा अभ्यास केला तर प्रत्येक दहा वर्षाला नैसर्गिकरित्या उसाच्या लागवडीखाली दर दुप्पट झाल्याचे सहजपणे लक्षात येते. पण गेल्या दहा वर्षांत मात्र ते घडले नाही. याचे कारण म्हणजे शेतकरी संघटनेमध्ये कारखानदार धार्जिन्या नेत्यांनी फूट पाडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची निर्मिती करण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे यांनी शेतकरी संघटनेत फूट पाडली आणि त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना निर्माण केली. सर्व कारखानदार स्वाभिमानीच्या मागणीला हात देत दर देऊ लागले. त्याचवेळी एसएमपी कायदा रद्द करण्यात आला आणि एफआरपी आणण्यात आली. एफआरपी आल्याने दरवाढ आपोआप खुंटली आहे.

एफआरपीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जर 50 वर्षांत प्रत्येक दहा वर्षाला उसाचा दर दुप्पट होत होता, तर मग गेल्या दहा वर्षांत तो का झाला नाही. याला कारण म्हणजे एफआरपी आहे. एफआरपी अधिक 50 रुपये द्या, म्हणून स्वाभिमानीने मागणी करायची आणि कारखानदारांनी त्याला विरोध करायचा आणि नंतर एफआरपी देतो असे सांगून हे आंदोलन संपवायचे यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडले नाही.

त्यामुळे यापुढील काळात शेतकऱ्यांनी आपल्या उसाचे भाव ठरविण्यासाठी बेगड्या पुढाऱ्यांच्या मागे लागू नये तसेच एफआरपीला विरोध करून पुन्हा एकदा एसएमपी आणण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. कारखानदारांनीच राजू शेट्टी यांना मोठे केले. कारखानदारांचे बगलबच्चे म्हणून राजू शेट्टी हे काम करत राहिले आहेत.

कारखानदारांच्या हिताचेच त्यांनी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राजू शेट्टी यांच्या पाठीशी विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे तिघेही कारखानदार नेते उभे राहिल्याने ते आमदार, खासदारही झाल्याची टीका रघुनाथ पाटील यांनी केली.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT