Solapur, 22 December : ईव्हीएमच्या विरोधात ठामपणे उभे राहणाऱ्या मारकडवाडी येथील ग्रामस्थांच्या भेटीसाठी येत्या पाच जानेवारी रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे गावात येणार आहेत. तसेच, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि खासदार प्रियांका गांधी हे दोघे 10 जानेवारी रोजी मारकडवाडीत येणार आहेत, त्यामुळे ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे.
विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम सातपुते यांना पडलेल्या मतांवर आक्षेप घेऊन मारकडवाडीच्या (Markadwadi) ग्रामस्थांनी बलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा खर्चही उचलण्याची तयारी ग्रामस्थांनी दाखवली होती. मात्र, प्रशासनाने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास परवानगी नाकारली होती, त्यामुळे मारकडवाडीत तणावाचे वातावरण होते.
दरम्यान, माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या मारकडवाडी दौऱ्याची माहिती दिली आहे. ते म्हणाले, येत्या पाच तारखेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मारकडवाडी ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर दहा जानेवारी रोजी खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे मारकडवाडीला येण्याचे निश्चित झाले आहे.
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसंदर्भात पारदर्शकता कशी आणायाची, याबाबत मी त्यांच्याशी दोन ते तीन दिवसांत चर्चा करणार आहे. त्यानंतर 2012 मध्ये ईव्हीएम मशीनला लावण्यात आलेल्या व्हीव्हीपॅट लावण्यात आलेले आहे. व्हीव्हीपॅट थेट मशिनमध्ये पडण्याऐवजी मतदाराच्या हातात आलं पाहिजे आणि त्यांनी ते मशीनमध्ये टाकाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी आमची माफक अपेक्षा आहे, असे जानकर यांनी स्पष्ट केले.
आमदार जानकर म्हणाले, आमचा ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटला विरोध नाही. फक्त व्हीव्हीपॅटची चिठ्ठी आमच्या हातात आली पाहिजे आणि ते मशीनमध्ये टाकण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.
आतापर्यंत मारकडवाडीत कोण कोण आले?
दरम्यान, मारकडवाडीच्या ग्रामस्थांशी यापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विद्या चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चर्चा करून ईव्हीएमविरोधातील लढ्याला पाठिंबा दिला आहे. तसेच, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी ईव्हीएमला समर्थन देत मारकडवाडीत सभा घेतली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.