Rahul Awade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha Election : हातकणंगलेत मशाल कोणाच्या हातात ? मातोश्रीवर खलबते

Rahul Awade : राहुल आवाडे यांनी मशाल हातात घेण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला असून, तिरंगी लढत होण्याचे संकेत दिलेत. यासंदर्भात आवाडेंशी कोल्हापुरात चर्चा सुरू असून, मातोश्रीवर खलबत्ते सुरू आहेत.

Rahul Gadkar

Hatkanangale Loksabha Election : हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर होताच महायुतीमध्ये बंडखोरीचे निशाण फडकले आहे. इचलकरंजीचे विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांनी हातकणंगलेच्या मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे.

त्यासंदर्भात गुरुवारी रात्री शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांच्याशी चर्चा झाली असून, लवकरच त्यासंदर्भात निर्णय घेणार आहेत. राहुल आवाडे हातात मशाल घेणार की अपक्ष निवडणूक लढवणार, हे दोनच दिवसांत जाहीर होणार आहे. दरम्यान, राहुल आवाडे यांनी मशाल हातात घेण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला असून, तिरंगी लढत होण्याचे संकेत दिलेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे (Rahul Awade) यांनी महायुतीवर नाराजी व्यक्त करत उमेदवारी देत असताना अपक्षांना सोबत घेणे आवश्यक होते. युतीप्रमाणे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार देत असताना शिवसेना शिंदे गटाने पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) आणि अन्य पदाधिकाऱ्यांना विचारात घेतले. त्याप्रमाणे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवार देत असताना आम्हाला कोणत्याच पद्धतीने विचारात घेतले नसल्याचा आरोपही या वेळी आवाडे यांनी केला. Rahul Awade gave a positive response regarding contest election in hatkanangale lok sabha.

गेले पंधरा वर्षे मी लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) तयारी करत आहे. 2019 ची लोकसभा निवडणूक नव्या मतदारसंघाप्रमाणे होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक लढवण्याची शेवटची संधी आहे. शिवाय आम्ही अपक्ष असून विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) काँग्रेस आणि भाजपने (BJP) देखील आमच्या विरोधात उमेदवार दिला होता. मात्र, त्या ठिकाणी आम्ही एक लाखापेक्षा जास्त मते घेऊन निवडून आलो आहोत. त्यामुळे निर्णय घेण्यास आम्ही सक्षम आहोत. येत्या दोन दिवसांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांना विचारात घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती राहुल आवाडे यांनी 'सरकारनामा'ला दिली आहे.

Edited By : Rashmi Mane

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT