Chandrajit Rajput  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nagar News: नगरमधील तहसीलदार निलंबित; अतिवृष्टीच्या अनुदान वाटपात अनियमिततेचा ठपका

Tehsildar Chandrajit Rajput Suspended: कार्यकर्त्यांनी राजपूत यांच्याविषयी तक्रारी केल्या होत्या.

Pradeep Pendhare

Nagar: राहुरीचे तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. राज्याचे अवर सचिव संजीव राणे यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले. मालेगाव (जि. नाशिक) येथे अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्यांच्या अनुदान वितरणात अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

चंद्रजीत राजपूत हे मालेगावमध्ये २०२० मध्ये कार्यरत होते. अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या अनुदान वाटपात अनियमिततेचा आरोप होता. त्याची चौकशी सुरू होती. यात त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. या कारवाईमुळे नगर जिल्ह्यातील प्रशासनात खळबळ उडाली आहे.

चंद्रजीत राजपूत यांची मालेगावमधून नगर जिल्ह्यात एप्रिल २०२३ मध्ये बदली झाली होती. मालेगावमध्ये काम करताना त्यांनी मंत्री, आमदार, माजी आमदार आणि विविध संघटनांच्या रोषाला समोरे जावे लागले होते. शेकाप नेते जयंत पाटील यांच्या एस.जे.शुगर कारखान्याविरुद्ध थकीत एफआरपीपोटी कारवाई केली होती. या कारवाईत त्यांनी 24 कोटी 82 लाख रुपयांचा मुद्देमाल सील केला होता. या कारवाईने राज्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली होती.

मालेगावमध्ये मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमासांठी ३३१ केंद्रस्तरीय अधिकाऱ्याची (बीएलओ) नियुक्ती करण्यात आली होती. यातील 73 बीएलओंनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या कारवाईचा बडगा चंद्रजीत राजपूत यांनी उगारला होता. यानंतर त्यांची बदली नगर जिल्ह्यात झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राहुरी तालुक्यात तहसीलदार म्हणून कार्यरत असताना त्यांनी तनपुरे सहकारी कारखाना जमीन घोटाळ्यात चुकीचा अहवाल सादर केल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला. यानंतर प्रहार जनशक्ती पक्ष आणि तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांच्या नेहमीच संघर्ष राहिला. प्रहार जनशक्तीचे पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांच्यापर्यंत कार्यकर्त्यांनी तहसीलदार राजपूत यांच्याविषयी तक्रारी केल्या होत्या.

तहसीलदार राजपूर यांच्या निलंबनाचा आदेश काढण्याबरोबर त्यांची विभागीय चौकशी सुरू आहे.निलंबनाच्या काळात त्यांना नगर जिल्हाधिकारी मुख्यालयात हजर राहण्याचा आदेश करण्यात आला आहे. त्यांना मुख्यालय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाशिवाय सोडता येणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT