Raj Thackeray Call To Vivekanand Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vivekanand Patil: पुण्यातील MPSC चं आंदोलन गाजवलेल्या विवेकानंदला राज ठाकरेंचा फोन; म्हणाले, 'लढ्याला यश, आता ...'

Pune MPSC Protest: : कोल्हापूरच्या रांगड्या अन् तितकाच बिनधास्त असलेल्या विवेकानंद पाटीलनं आपल्या रोखठोक भूमिका आणि मुद्देसूद भाषणानं एमपीएससी आंदोलनातील सहभागी विद्यार्थ्यांच्या मनाचा ठाव घेतला. त्याचा हजरजबाबीपणा आणि कोल्हापूर स्टाईलची भाषणं सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाली.

Deepak Kulkarni

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील माजगावचा विवेकानंद पाटील हा तरुण तडफदार विद्यार्थी हा पुण्यात तब्बल 12 दिवस चाललेल्या MPSC आंदोलनादरम्यान राज्यभरात चर्चेचा विषय ठरला. त्याने आपल्या धारदार कोल्हापुरी शैलीत आणि प्रभावी वक्तृत्वानं दिग्गज नेत्यांसमोर भाषणं गाजवली. त्याच्या भाषणांमधील तंतोतंत लागू होणार्‍या कविता,शेरोशायरी आणि प्रश्नांची मांडणी या सगळ्या त्याच्या खास शैलीमुळे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि हजारो विद्यार्थ्यांचा आवाजही बनला.याच विवेकानंदला आता थेट मनसे अध्यक्षांचा फोन आल्याची माहिती समोर येत आहे.

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत सरकारने आंदोलकांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. तसेच तुकाराम मुंढेंचीही चौकशी समितीच्या सचिवपदी नियुक्ती केली. त्यामुळे पुण्यात आंदोलन तब्बल 12 दिवसांनंतर स्थगित करण्यात आलं. यानंतर विवेकानंद पाटील आपल्या मूळ गावी परतला आहे.

यावेळी विवेकानंद पाटीलनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आपल्याला फोन आला असल्याची माहिती दिली आहे. यावेळी राज ठाकरेंनी त्याला मुंबईला भेटण्यासाठी बोलावल्याचंही त्यानं सांगितलं. यावेळी त्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या विनंतीला मान देत आंदोलनस्थळी हजेरी लावल्याचंही आवर्जून म्हटलं.

विवेकानंद पाटील म्हणाला, राज ठाकरे यांचा नुकताच फोन येऊन गेला.त्यांनी लढ्याला यश मिळालं. आता मुंबईला येऊन भेटून जा,असा निरोप दिला असल्याची माहिती दिली. यावेळी त्यानं आपण राज ठाकरे यांची मुंबईत जाऊन भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे. राधानगरी तालुक्यातील त्याच्या मूळ गावी ग्रामस्थांकडून विवेकानंदचं जंगी स्वागत करण्यात आलं.

पदवीच्या दुसऱ्या वर्षापासून विवेकानंदने MPSC परीक्षेची तयारी सुरू केली आहे.आतापर्यंत MPSC च्या परीक्षा दिल्या आहेत. सध्या त्याची मराठी माध्यमातून UPSC च्या मुख्य परीक्षेची तयारी करतो आहे. विवेकानंद पाटील हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील माजगावचा आहे. त्याचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून आई गृहिणी आहे.त्याच्या कुटुंबात अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे.

विवेकानंदने कुरुकली येथील भोगावती महाविद्यालयातून राज्यशास्त्राची विशेष प्राविण्यासह पदवी मिळवली आहे. याच विवेकानंदने पुण्यातील एमपीएससीचं आंदोलन गाजवलं आहे. आंदोलन स्थगित झाल्यानंतरही विवेकानंदची विद्यार्थी गटासह राजकीय वर्तुळात असलेली क्रेझ कमी झाली नसल्याचं दिसून येत आहे.

कोल्हापूरच्या रांगड्या अन् तितकाच बिनधास्त असलेल्या विवेकानंद पाटीलनं आपल्या रोखठोक भूमिका आणि मुद्देसूद भाषणानं एमपीएससी आंदोलनातील सहभागी विद्यार्थ्यांच्या मनाचा ठाव घेतला. त्याचा हजरजबाबीपणा आणि कोल्हापूर स्टाईलची भाषणं सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाली.

विशेष म्हणजे आपली मर्यादा सांभाळत व आंदोलनाही कोणतेही गालबोट न लावता त्याने सत्ताधारी भाजपच्याही अनेक नेत्यांना फैलावर घेतलं. वेळप्रसंगी त्यानं या महायुतीच्या नेत्यांना जशास तसं वार-पलटवार करत उत्तर दिलं.त्यामुळेच त्याचं अनेकांनी जाहीर कौतुकही केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT