BJP leader robbery case : भाजपमध्ये प्रमोशन, पदग्रहणानंतर नेत्यानं फार्म हाऊस गाठलं; रात्री चोरट्यांनी हातपाय बांधले, लाखोंची लूट

Ramesh Yadav robbery, Kanpur farmhouse robbery : घरात आराम करत असताना काही तोंडावर कापड बांधलेले चोरटे घरात घुसले. त्यांनी यादव यांच्यासह फार्म हाऊसमधील इतरांचे हातपाय बांधले.
Ramesh Yadav
Ramesh Yadav Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Uttar Pradesh crime news : उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजप नेते रमेश यादव यांची नुकतीच भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश मंत्रि‍पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यादव यांनी पक्षात प्रमोशन झाल्याचा आनंद सहकारी पदाधिकारी, समर्थकांसोबत साजरा केला. त्यानंतर ते कानपूरमधील फार्महाऊसवर परतले. पण रात्री घरात घुसलेल्या चोरट्यांनी त्यांचे हातपाय बांधून लाखोंची लूट केली.

रमेश यादव यांचे फार्म हाऊस कानपूर शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. चोरट्यांनी तब्बल १५ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. यादव यांची १ ऑक्टोबर रोजी प्रदेश मंत्रि‍पदावर नियुक्ती झाले आहे. ते सोमवारी (ता. १२) पदग्रहण समारंभानंतर रात्री उशिरा कानपूर जवळील फार्म हाऊसमध्ये परतले होते.

घरात आराम करत असताना काही तोंडावर कापड बांधलेले चोरटे घरात घुसले. त्यांनी यादव यांच्यासह फार्म हाऊसमधील इतरांचे हातपाय बांधले. त्यानंतर चोरट्यांनी संपूर्ण फार्म हाऊसमध्ये धुडगूस घातला. सुमारे ५० लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या हायप्रोफाईल चोरीची संपूर्ण राज्यात चर्चा सुरू आहे.

Ramesh Yadav
Vinod Tawde news : भाजपला केवळ 3 जागा, पक्षाने जनतेचा कौल स्वीकारला! प्रभारी असताना झालेल्या पराभवाकडे बोट दाखवत विनोद तावडेंचा काँग्रेसवर घाव

रमेश यादव हे भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते आहे. सुरूवातीला ते बहुजन समाज पक्षात होते. २०२२ मध्ये त्यांनी पक्षाच्या तिकीटावर बिठूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांच्याकडे नुकतीच प्रदेश मंत्रि‍पदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

Ramesh Yadav
Rahul Gandhi Supreme Court petition : मोठा गाजावाजा करत याचिका दाखल, पण राहुल गांधींना काही तासांतच झटका; 14 कारणांमुळे लगेच सुनावणी नाही...

चोरीची ही घटना समोर आल्यानंतर राज्य सरकारही हादरले असून पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. मात्र, अद्याप कोणताही सुगावा पोलिसांच्या हाती लागला नसल्याची प्राथमिक माहिती आहे. सत्तापक्षातील नेत्याच्या घरावरच दरोडा पडल्याने सरकारही बॅकफुटवर गेले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com