Raj Thackeray-Rohit Pawar
Raj Thackeray-Rohit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

भाजप हा सहकारी पक्ष, नेत्याला संपवतो, हे राज ठाकरेंनी लक्षात ठेवावे : रोहित पवारांचा सल्ला

भारत नागणे

पंढरपूर : सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना शब्द हे जपून आणि मोजून वापरले पाहिजेत, असा खोचक सल्ला देत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे कान टोचले आहे, तर दुसरीकडे भाजपच्या नादी न लागता जपून पावले टाकावीत, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना दिला आहे (Raj Thackeray should keep in mind BJP eliminates co-operative parties & leaders)

आमदार रोहित पवार यांच्या हस्ते गुरुवारी (ता. ७ एप्रिल) संत छाया वारकरी भवनाचे भूमिपूजन कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर टीका केली. ईडीने कारवाई केल्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी असंसदीय आणि खालच्या भाषेत किरीट सोमय्यांवर टीका केली आहे. राऊत यांच्या शिवराळ भाषेविषयी सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. याविषयी आमदार पवार यांना विचारले असता, त्यांनी वरील टिप्पणी केली.

आमदार पवार म्हणाले की, ईडीने चुकीच्या पध्दतीने कारवाई केल्यानंतर त्यांची भावना समजू शकतो. परंतु सर्वच राजकीय नेत्यांनी शब्द मोजून आणि मापून बोलले पाहिजेत. सध्या राजकीय हेतूने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडी, इन्कम टॅक्स या संस्थांच्या माध्यमातून कारवाया केल्या जात आहेत. आम्ही कोणीही अशा कारवायांना घाबरणार नाही. तरीही अशा वेळी भावनिक न होता, शांतपणे त्यास प्रत्युत्तर दिले पाहिजे, असेही त्यांनी सर्वच नेत्यांना सुनावले. महाराष्ट्रात दडपशाही पद्धतीने कारवाया सुरु झाल्यास त्यास लोक सामोरे जातील; परंतु दिल्लीपुढे आम्ही झुकणार नाही, असेही आमदार पवार यांनी यावेळी नमूद केले.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे जातीय तेढ निर्माण करणारी भाजपची भाषा बोलत आहेत. मात्र, भाजपने त्यांच्या जवळ गेलेल्या नेत्याला व पक्षाला संपवले आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी यापुढच्या काळात जपून पावले टाकावीत, असा सल्लाही आमदार पवार यांनी ठाकरे यांना दिला आहे. यावेळी डीव्हीपी उद्योग समुहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील, व्यापर उद्योग विभागाचे प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे, सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, युवराज पाटील, संदीप मांडवे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT