'..राजकारण सोडेल,' म्हणणाऱ्या आव्हाडांना राज ठाकरे प्रत्युत्तर देतील का?

रामनवमीच्या पुर्वसंध्येलाच राज यांची सभा होत असून ते या मुहूर्ताची संधी साधत पुन्हा राष्ट्रवादीला लक्ष्य करतील असे मानले जाते.
Jitendra Awhad, Raj Thackeray
Jitendra Awhad, Raj Thackeraysarkarnama

मुंबई : कट्टर हिंदुत्ववादाची कास धरू पाहणाऱ्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना आठ दिवसातचं दुसरी सभा घ्यावी लागत असल्याचे आश्चर्य आहे. रामनवमीच्या मुहूर्तावर राज राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या टीकेला प्रत्युत्तर देतील असे संकेत आहेत.

मशिदीवरील भोंगे आणि मुब्र्यातील मदरसे याबाबत राज यांनी नवीन राजकीय अजेंडा हाती घेतला. भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वाची उजळणी करत राज नव्या राजकीय भूमिकेत अवतरले आहेत. राज्यभरात मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी मनसेने मोहिम छेडली आहे.

मदरशामध्ये अनेक गुपीत दडल्याचा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला. राज यांच्या या आरोपांना जितेंद्र आव्हाड यांनी तडकाफडकी प्रत्युत्तर देत, मुंब्र्यातील एकाही मदरशामध्ये वस्तरा सापडला तरी राजकारण सोडेल, असे आव्हानच आव्हाडांनी दिले.

Jitendra Awhad, Raj Thackeray
राज ठाकरेंच्या 'उत्तरसभे'ला ठाण्याच्या पोलिसांकडून दणका ; मनसे ठाम

याच पार्श्वभूमीवर राज 9 एप्रिलला ठाण्यात सभा घेत असून ते जितेंद्र आव्हाड यांच्या आव्हानाला कसे उत्तर देतात याची उत्सुकता आहे. दरम्यान, रामनवमीच्या पुर्वसंध्येलाच राज यांची सभा होत असून ते या मुहूर्ताची संधी साधत पुन्हा राष्ट्रवादीला लक्ष्य करतील असे मानले जाते. कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेवून राज मैदानात उतरले असल्याने भारतीय जनता पक्षात आनंदाचे वातावरण आहे. तर, शिवसेनेच्या हिंदुत्वासोबतच राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट करण्याची राज यांचा पवित्रा राज्याच्या राजकारणाला ध्रुवीकरणाच्या वाटेवर कसा घेवून जाईल हे पाहणे महत्वाचे आहे.

राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा जातीपातीचा मुद्दा उकरुन काढला. त्यांनी राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. आव्हाडांनी राज ठाकरे यांच्या भाषणातील विविध मुद्द्यांना टि्वट करीत प्रत्युत्तर दिलं आहे.

''राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)आणि शरद पवार (Sharad Pawar)यांना महाराष्ट्रात जातीयवाद हवा आहे. राष्ट्रवादीच्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झालं आहे. राष्ट्रवादीने दुसऱ्या जातीचा द्वेष निर्माण करायला लावला. त्यामधून समाजात फूट पाडली जात आहे, असा घाणाघात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढी पाडवा मेळाव्यात केला.

Jitendra Awhad, Raj Thackeray
MNS:राज ठाकरे 'उत्तरसभे'त काय बोलणार ; संदीप देशपांडेंनी दिलं उत्तर..

राज ठाकरेंनी आपल्या भाषणात मदरशांमधील घडामोडींबद्दल प्रश्न उपस्थित केले. मदरशांमध्ये धाडी टाकाव्यात अशी विनंती त्यांनी पंतप्रधान मोदींकडे केली. या मुद्द्यावरून आव्हाडांनी राज ठाकरेंना टि्वट करुन खुलं आव्हान दिलं. "राज ठाकरे यांनी मुंब्र्याबद्दल कारण नसताना जातीयवादी विधान केलं.माझं राज यांना जाहीर आव्हान आहे की, त्यांनी माझ्यासोबत मुंब्र्यातील कोणत्याही मदरशात यावं. दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडून देईन. मुंब्र्यात काही शतकं हिंदू-मुसलमान प्रेमानी राहतात. मुंब्र्याला बदनाम करू नका."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com