<div class="paragraphs"><p>Monica Rajale Vs Pratap Dhakne</p></div>

Monica Rajale Vs Pratap Dhakne

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

Rajale vs Dhakne: पाथर्डी नगरपालिका निवडणुकीसाठी राजळे-ढाकणेंची मोर्चे बांधणी सुरू

सरकारनामा ब्युरो

उमेश मोरगावकर

पाथर्डी ( अहमदनगर ) : पाथर्डी नगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. त्या दृष्टीने भाजपच्या ( BJP ) आमदार मोनिका राजळे ( Monica Rajale )राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे ( Pratap Dhakne ) यांनी राजकीय मोर्चे बांधणी सुरू केली आहे. Rajale-Dhakne preparations for Pathardi municipality started

आगामी पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आमदार मोनिका राजळे व प्रताप ढाकणे यांनी मतदारांच्या घरातील जेवणावळीतून लंच डिप्लोमसी सुरू केली आहे. आपल्या कार्यकर्त्यांच्या थेट घरी जाऊन नाश्ता व जेवण करीत मतदार कुटुंबांशी संवाद साधायला सुरवात केली आहे.

पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ उद्या ( ता. 27 ) संपत आहे. कधीही पालिकेची निवडणूक जाहीर होईल, असे गृहीत धरीत सध्या या दोघांनी मोर्चेबांधणी करायला सुरवात केली आहे.

भाजप व राष्ट्रवादीची सर्व मदार ही राजळे व ढाकणे यांच्यावर आहे. आजपर्यंतच्या विधानसभा निवडणुकीत ज्याची पालिकेवर सत्ता आहे, त्याला विधानसभेला फायदा होत असल्याने पालिकेवर आपलीच सत्ता असावी. या हेतूने राजळे व ढाकणे हे प्रयत्नशील आहेत. मागील आठवड्यात ढाकणे यांनी शहरातील भाजप नगरसेविका दीपाली बंग, सोमनाथ पलोड व रामभाऊ बजाज यांच्या घरी सदिच्छा भेट देत अल्पोहार केला.

पाठोपाठ राजळे यांनीही दीपक गोळख, प्रभाकर पवार व राजेंद्र हारकुट यांच्या घरी भेट देत चहापान व जेवण घेतले. आगामी पालिका निवडणुकीत नगरसेवकांची संख्या वाढली आहे. 17 वरून 20 झाली आहे. वॉर्ड रचनासुद्धा बदलली आहे. वाढत्या नगरसेवकांच्या संख्येचा व बदलत्या रचनेचा आपल्याला कसा फायदा होईल, याचा अंदाजही राजळे व ढाकणे या भेटीत घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या दोघांनीही लंच डिप्लोमसी सुरू केली आहे. या दोघांच्या या पॉलिसीमुळे मात्र निवडणुकीआधीच कार्यकर्त्यांचा भाव चांगलाच वधारला आहे. या दोघांची ही पॉलिसी नेमकी कोणाला पसंती देते. हे मात्र निवडणुकी नंतरच स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT