Rajan Patil, Yashwant Mane sakarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur : मोहोळ तालुक्यात राजन पाटलांना चॅलेंजच नाही... यशवंत माने

आमदार बबनदादा शिंदे MLA Babandada Shinde आणि मोहोळचे राष्ट्रवादीचे NCP माजी आमदार राजन पाटील Rajan Patil यांनी नुकतीच नवी दिल्लीत New Delhi महाराष्ट्र सदनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांची भेट घेतली.

Umesh Bambare-Patil

सोलापूर : मोहोळ तालुक्यात लोकनेते परिवार आणि राजन पाटील यांना कुठल्याप्रकारचे चॅलेंज नाही, कोणाचेही आव्हान नाही. त्यांना चॅलेंज करणारे नेतृत्व विरोधात व पक्षातही सध्या नाही. पक्ष श्रेष्टींचा हात त्यांच्या डोक्यावर आहे, असे स्पष्ट मत मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांनी व्यक्त केले आहे.

माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे आणि मोहोळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी मागे नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. यावर भाष्य करता मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांनी राजन पाटील व त्यांचे दोन्ही चिरंजीव भाजप प्रवेशाचा निर्णय घेणार नसल्याचे स्पष्ट केले.

यशवंत माने म्हणाले, मोहोळ तालुक्यात लोकनेते परिवार आणि राजन पाटील यांना कुठल्याप्रकारचे चॅलेंज नाही, कोणाचेही आव्हान नाही. तसेच त्यांच्याविषयी जनतेत नाराजी नाही. त्याचे काम चालुच आहे. मुळात व्देष कोणाचा करावा, बरोबरीच्या लोकांचा व्देष करावा. राजन पाटलांना चॅलेंज करणारे नेतृत्व विरोधात व पक्षात ही सध्या नाही.

तसेच त्यांच्या डोक्यावर पक्ष श्रेष्टींनी हात ठेवला आहे. काकांनी कोणाचे नाव घेतलेले नाही. पण, ते कोणाला बोलले ते त्यांनाच विचारावे लागेल. मोहोळ तालुक्याता राजन पाटलांना चॅलेंज करणारे नेतृत्व नाही, भविष्यातही होणार नाही.त्यामुळे भाजप प्रवेशाबाबत त्यांच्यासह त्यांचे दोन्ही चिरंजीव कोणताही निर्णय घेणार नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT