2009 ते 2019 या दहा वर्षांच्या कार्यकाळात मोहोळ मतदारसंघात विकासात्मक कामे झालं नाहीत. पण, 2019 मध्ये देखणा आणि खमक्या आमदार यशवंत माने यांच्या रूपानं आम्हाला मिळाला. यशवंत माने यांनी अपेक्षिततेपेक्षा दहापट काम मोहोळमध्ये केलं, अशी स्तुतीस्तुमने मोहोळचे माजी आमदार, राजन पाटील यांचे सुपुत्र आणि लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमोर उधळली आहे.
मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अजितदादा पवार ) जनसन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील आणि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तेव्हा, बाळराजे पाटील यांनी मोहोळमध्ये दोनच पक्ष असल्याचं अजितदादांसमोर ( Ajit Pawar ) सांगितलं आहे.
बाळराजे पाटील म्हणाले, "सोलापूर जिल्ह्यात 11 मतदारसंघ आहे. पण, 11 मतदारसंघात मोहोळ हा आगळावेगळा आहे. महाराष्ट्रात 8 ते 10 पक्ष असतील. परंतु, मोहोळ मतदारसंघात फक्त दोनच पक्ष आहेत. पहिला राजन पाटील ( Rajan Patil ) यांना मानणारा वर्ग. दुसरा म्हणजे आपली सभा सोडून ऐकणाऱ्यांपैकी एक ( विरोधक)."
"सोलापूर जिल्ह्यात मोहोळ मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 1995 पासून राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून दिला आहे. सलग 6 वेळा राष्ट्रवादीचा आमदार येथून निवडून आला. पण, 2009 मध्ये हा मतदारसंघ आरक्षित झाला. तरीही तालुक्यानं पक्षावरील निष्ठा ढळू दिली नाही. आरक्षित मतदारसंघ असताना सुद्धा राष्ट्रवादीनं दिलेल्या उमेदवाराला विधानसभेत काम करण्याची संधी मोहोळ तालुक्यानं दिली आहे," असं बाळराजे पाटील यांनी सांगितलं.
"2009 ते 2019 दहा वर्षांच्या काळात पाहिजे, तसं विकासकामे मोहोळ मतदारसंघात झाली नाहीत. मतदार, शेतकरी, तरूणांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू शकलो नाही. ही शोकांतिका आहे. मात्र, 2019 मध्ये देखणा आणि खमक्या आमदार यशवंत माने यांच्या रूपानं आम्हाला मिळाला. पाच वर्षांत अजितदादांच्या नेतृत्त्वाखाली यशवंत माने यांनी अपेक्षिततेपेक्षा दहापट विकासकामे केली आहेत," असं बाळराजे पाटील यांनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.