Ajit Pawar News : 'दादा आपसे बैर नही, राजन पाटील तेरी खैर नही'; अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील आक्रमक

Political News : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोहोळ बंदची हाक देण्यात आली आहे.
Rajan Patil, Ajit Pawar, Umesh Patil
Rajan Patil, Ajit Pawar, Umesh Patil Sarkarnama
Published on
Updated on

Solapur News : राज्यातील विधानसभा निवडणुकाचे बिगुल वाजण्यास काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या तीन दिवसापासून एकीकडे महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा सुरु आहे. दुसरीकडे महायुतीकडून जागावाटपाची चर्चा सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच सर्वत्र निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यातच आता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोहोळ बंदची हाक देण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) रविवारी मोहोळ दौऱ्यावर आहेत. त्याचवेळी मोहोळ बंद पुकारण्यात आला आहे. 'दादा आपसे बैर नही, राजन पाटील तेरी खैर नही', असे म्हणत राष्ट्रवादी कॉँग्रेस (NCP) अजित पवार गटाचेच मुख्य प्रवक्ते उमेश पाटील आक्रमक झाले आहेत. ( Ajit Pawar News)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जनतेच्या भावना कळाव्यात म्हणून मोहोळ बचाव संघर्ष समितीच्या वतीने बंदची हाक देण्यात आली आहे. अनगर येथे झालेले अपर तहसील कार्यालय रद्द करावे, या मागणीसाठी आम्ही रविवारी बंदची हाक देत असल्याचे सांगण्यात आले.

अजित पवार हे माझे नेते असले तरी मोहोळ तालुक्यातील जनतेच्या भावना किती तीव्र आहेत हे लक्षात आणून देण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द व्हावे, ही भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत जावी म्हणून मोहोळ बचाव संघर्ष समितीचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली आहे.

Rajan Patil, Ajit Pawar, Umesh Patil
Supriya Sule : 'जय श्रीराम'च्या घोषणा अन् सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मी उत्तर देऊ शकते, पण..."

अजित पवार काय घोषणा करणार याकडे लक्ष

अनगर अप्पर तहसील कार्यालय करण्यात आल्याने मोहोळ तालुक्यातील नागरिकांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे हे अप्पर तहसील कार्यालय रद्द करून नागरिकांची सोय होणाऱ्या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार या दौऱ्यावेळी काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Rajan Patil, Ajit Pawar, Umesh Patil
MVA News : काँग्रेस-ठाकरे-पवारांचं ठरलं; 288 जागांची चर्चा पूर्ण, 'या' फॉर्म्युल्यानुसार होणार जागावाटप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com