<div class="paragraphs"><p>Rajendra Phalke, NCP</p></div>

Rajendra Phalke, NCP

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

राजेंद्र फाळके म्हणाले, प्रताप ढाकणे षटकार मारणार...

सरकारनामा ब्युरो

उमेश मोरगावकर

पाथर्डी ( अहमदनगर ) : पाथर्डी नगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे पाथर्डीत राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहे. भाजप ( BJP ) आमदार मोनिका राजळे ( Monica Rajale ) या पूर्वी औरंगाबाद विद्यापीठाच्या क्रिकेट संघाच्या कर्णधार होत्या. सुमारे 30 वर्षांनंतर पुन्हा त्यांनी पाथर्डीत एक क्रिकेट सामन्यात सहभाग घेतला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी आमदार राजळे यांचा नामोल्लेख टाळत टीका केली. Rajendra Phalke said, Pratap Dhakne will hit sixes ...

माजी आमदार (स्व.) माधवराव निऱ्हाळी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रताप ढाकणे, शिवशंकर राजळे, बंडू बोरुडे, सुरेश मिसाळ, गहिनीनाथ शिरसाठ, सीताराम बोरुडे, रत्नमाला उदमले, सविता भापकर, सविता डोमकावळे, दीपक देशमुख उपस्थित होते.

राजेंद्र फाळके म्हणाले, तुमच्या तालुक्यात काहीजण हातात बॅट घेऊन ती हवेत फिरवतात. मात्र, आता येणाऱ्या निवडणुकीत प्रताप ढाकणे हेच षटकार मारणार असल्याची टीका राजेंद्र फाळके यांनी केली.

फाळके पुढे म्हणाले की, या ठिकाणी पालिका होऊन 25 वर्ष झाले. तरीही महिलांसाठी स्वछतागृह नाही. ही शोकांतिका असून येणाऱ्या निवडणुकीत पालिकेची सत्ता ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या ताब्यात दिल्यास बदल घडवून दाखविणार आहोत. कर्तबगार आमदारांनी इतकी विकासकामे केली, की या कामांची उद्‌घाटने नारळ फोडून केल्याने तालुक्यात कुठेही नारळ शिल्लक नाहीत. पाच वर्षे गायब असलेला जेसीबी आताच कसा आला. घोडा व मैदान जवळ आले आहे, अशी टीकाही ढाकणे यांनी केली.

या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक सिहंगड किंग्ज या संघाने तर द्वितीय पारितोषिक प्रतापगड इलेव्हन संघाने जिंकले. अतिष निऱ्हाळी यांनी प्रास्तविक केले. शशिकांत निऱ्हाळी यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT