आमदार मोनिका राजळे आज मैदानावर खेळणार क्रिकेट

पाथर्डी-शेवगाव मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे ( Monica Rajale ) या राजकीय मैदानावरील मोठ्या खेळाडू आहेत.
Monica rajale

Monica rajale

Sarkarnama

Published on
Updated on

उमेश मोरगावकर

पाथर्डी ( अहमदनगर ) : पाथर्डी-शेवगाव मतदार संघाच्या भाजप ( BJP ) आमदार मोनिका राजळे ( Monica Rajale ) या राजकीय मैदानावरील मोठ्या खेळाडू आहेत. तशाच त्या क्रिकेटच्या मैदानावरीलही मोठ्या खेळाडू होत्या. त्यांनी औरंगाबाद विद्यापीठाकडून अनेक सामन्यांत मैदान गाजवले होते. लग्नानंतर त्यांनी कधी क्रिकेट खेळले नाही पण आज त्या पुन्हा क्रिकेट मैदानात उतरणार आहे. MLA Monica Rajale will play cricket on the field today

मोनिका राजळे यांचे वडील अशोक पाटील डोणगावकर हे युती सरकारच्या काळात शिवसेनेकडून मंत्री होते. त्यांनी मोनिका राजळेंना उत्तम शिक्षण दिलं. शिक्षणाबरोबरच खेळालाही तितकच महत्त्व देण्याचे संस्कार केले. एकेकाळी विद्यापीठाच्या महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व करणाऱ्या आमदार मोनिका राजळे अनेक वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर उतरणार आहेत. आज (सोमवारी) पालिकेने आयोजित केलेल्या नगरपरिषद चषक क्रिकेट स्पर्धेत त्या खेळाडू म्हणून सहभागी होत आहेत.

<div class="paragraphs"><p>Monica rajale</p></div>
मोनिका राजळे म्हणाल्या, सध्या काहींना निवडणुका जवळ आल्याने डोहाळे लागलेत...

महाविद्यालयीन जीवनातच आमदार राजळे यांनी क्रिकेट खेळायला सुरवात केली. काळाच्या ओघात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघात त्यांची निवड होऊन या संघाचे नेतृत्व सुद्धा त्यांनी केले होते. (स्व.) राजीव राजळे यांच्याशी विवाह झाल्यानंतर क्रिकेटला त्यांनी पूर्णविराम दिला होता. मात्र, आज होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत त्या स्वतः खेळाडू म्हणून सहभागी होणार असून बॅटिंगसह बॉलिंगही करणार आहेत. श्री. त्रिलोक जैन विद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून पालिका, वकील, पोलिस, पत्रकार, पंचायत समिती, श्री त्रिलोक जैन विद्यालयाचे असे मिळून एकूण आठ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

<div class="paragraphs"><p>Monica rajale</p></div>
विरोधकांचा निधी वळविला जातोय ! आमदार मोनिका राजळे यांची सरकारवर टीका

टेनिस बॉलवर या स्पर्धा खेळल्या जाणार असून विजेत्या व उपविजेत्या संघाला तसेच प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ दि मॅच, मॅन ऑफ दि सिरीज ही सर्व पारितोषिके दिली जाणार आहेत. या स्पर्धेत नगरसेवक, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य तसेच पत्रकार, वकील, पोलीस अधिकारीही खेळाडू म्हणून सहभागी होणार आहेत. स्पर्धा यशस्वीतेसाठी नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, नगरसेवक महेश बोरुडे हे प्रयत्न करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com