Solapur, 28 April : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (ता. 28 एप्रिल) बार्शीच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीबाबत भाष्य केले आहे. आज एवढंच सांगतो की, राजाभाऊ राऊत यांना राजकीय भविष्य आहे, असे सांगून त्यांनी विधान परिषद आमदारकीबाबत जास्त बोलणं टाळलं.
भगवंत महोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज (ता. २८ एप्रिल) बार्शीच्या दौऱ्यावर आले आहेत. भगवंतांचं दर्शन घेऊन माध्यमांशी बोलताना त्यांना राजेंद्र राऊत यांच्या विधान परिषद उमेदवारीबाबत छेडण्यात आले, त्यावेळी त्यांनी दिल्लीकडे बोट दाखवले मात्र राऊत यांना राजकीय भविष्य असल्याची पुष्टी जोडली.
ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल म्हणजे बार्शी तालुक्यातील जनतेने मागच्या काळात जी चूक (विधानसभा निवडणुकीतील राजेंद्र राऊतांचा पराभव) केली होती. त्याची जाणीव होऊन एक मोठा आशीर्वाद राऊत यांना दिला आहे.
माजी आमदार राजेंद्र राऊत हे सातत्याने जनतेसाठी संघर्ष करणारे नेते आहेत. त्यांना भरपूर राजकीय आयुष्य आहे. त्यामध्ये त्यांना अनेक पदं मिळतील. त्यांच्यासारख्या नेत्याची भारतीय जतना पक्षात कदरच होते, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
विधान परिषदेकरिता कुठली नावं चर्चेत आहेत, त्यांचं काय होणार आहे. याचा निर्णय काही मी घेत नाही. आमचं (भारतीय जनता पक्षाचं) पार्लमेंटरी बोर्ड घेतं. त्यामुळे दिल्लीत भाजप पार्लमेंटरी बोर्डात काय निर्णय होईल, त्यानुसारच सर्व निर्णय होतील. पण एवढंच सांगतो की, राजाभाऊ राऊत यांना भविष्य आहे.
भगवंत देवस्थानचा आराखडा माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी तयार केला आहे, त्याला आम्ही समर्थन देणार आहोत. भगवंताने सर्वकाही दिलं आहे. आपले भगवान असे आहेत की, त्यांना मागवं लागत नाही. त्यांच्यपुढे नतमस्तक झालं की, आपल्या मनोकामना पूर्ण होतात. ईश्वरीय शक्ती ही मानसिक बळ देणारी आहे. मानसिक बळ मिळालं की, कितीही प्रश्न आले तर त्यावर आपण उत्तर शोधू शकतो, असेही फडणवीस म्हणाले.
राजेंद्र राऊतांची एक मागणी मान्य होणार
आषाढी एकादशीच्या दिवशी जशी विठ्ठलाची पूजा होते, त्याच्या धर्तीवर सोलापूरच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते आषाढीला भगवंताची पूजा व्हावी, या राजेंद्र राऊत यांच्या मागणीचा नक्की विचार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.