Prashant Ambi Detained : संजय गायकवाड यांच्या बुलढाण्यात निघालेले प्रकाशक प्रशांत आंबी यांना पोलिसांनी नेलं अज्ञातस्थळी, आंदोलन पेटणार?

Shivaji kon hota Book Controversy : बुलढाण्यात आज आमदार संजय गायकवाड यांच्या निवासस्थानासमोर 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे जाहीर वाचन केले जाणार आहे. यासाठी सकाळपासून मोठ्या प्रमाणात सीपीआयचे कार्यकर्ते हातात गोविंद पानसरेंची प्रतिमा घेऊन उपस्थित राहिले आहेत.
Prashant Ambi Detained | Shivaji Book Controversy
Prashant Ambi Detained | Shivaji Book ControversySarkarnama
Published on
Updated on

Buldhana News, 28 Apr : कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याचे पडसाद सध्या संपूर्ण राज्यभरात उमटत आहेत.

अशातच आता पोलिसांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना एका अज्ञातस्थळी स्थानबद्ध केल्याची माहिती समोर आली आहे. आज बुलढाणा शहरात निषेध मोर्चा काढण्यात येणार होता. या मोर्चात प्रकाशक प्रशांत आंबी देखील सहभागी होणार होते.

यासाठी ते काल रात्री कोल्हापूरहून बुलढाण्यात येत असताना बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीतच त्यांना बुलढाणा पोलिसांनी स्थानबद्धी केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची पुष्टी स्वत: पोलिसांनी केली आहे. त्यामुळे आता आंबी हे नियोजित आंदोलन स्थळी पोहचण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे.

Prashant Ambi Detained | Shivaji Book Controversy
Amol Mitkari : 'अजून महाराष्ट्र खूप काही बघणार आहे...'; अजितदादांच्या मृत्यूला 3 महिने पूर्ण, अमोल मिटकरींना सतावू लागली भीती...

नेमकं प्रकरण काय?

आज आमदार संजय गायकवाड यांच्या निवासस्थानासमोर 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे जाहीर वाचन केले जाणार आहे. यासाठी आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात सीपीआयचे कार्यकर्ते हातात गोविंद पानसरेंची प्रतिमा घेऊन उपस्थित राहिले आहेत.

या आंदोलनासाठी प्रकाशक आंबी देखील येणार होते मात्र त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलं आहे. तर दुसरीकडे आंबी यांचे समर्थांकडून आता गायकवाड यांच्याविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. थोड्याच वेळात आंदोलनस्थळी शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन केलं जाणार आहे. तर या पुस्तक वाचनाच्या ठिकाणी आपण जाणार असल्याचं आमदार गायकवाड यांनी सांगितलं आहे.

Prashant Ambi Detained | Shivaji Book Controversy
Nashik TCS case : निदा खानने हिंदू तरुणीचे नाव 'हानिया' ठेवलं, तिला मलेशियाला..; अॅड अजय मिसरांनी कोर्टात मांडले धक्कादायक मुद्दे

त्यामुळे आता एका बाजूला सीपीआयचे कार्यकर्ते तर दुसऱ्या बाजीला संजय गायकवाडांचे कार्यकर्ते आंदोलन ठिकाणी जमले आहेत. त्यामुळे आता हे आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैणात करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com