सोलापूर : बार्शी (Barshi) तालुक्यात निवडणूक झालेल्या दोन्ही ग्रामपंचायतीवर (Gram Panchayat) आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) गटाचा झेंडा फडकला आहे. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर बार्शी तालुक्यात प्रथमच निवडणूक झाली आहे. या निवडणुकीतून आमदार राऊत यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. या दोन्ही गावांपैकी पानगाव हे मोठे असून विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने निर्णायक भूमिका बजावणारे आहे. त्या गावावर राऊत समर्थकांनी सत्ता मिळविली आहे. (Rajendra Raut's group is in power on both Gram Panchayats in Barshi)
सोलापूर जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायतीसाठी गुरुवारी (ता. ४ ऑगस्ट) मतदान झाले होते. त्याचा निकाल आज (ता. ५ ऑगस्ट) जाहीर झाला आहे. त्यात बार्शी तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींचा समावेश होतो. या दोन्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप समर्थक अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाने विजय मिळविला आहे.
माजी मंत्री आणि बार्शीचे माजी आमदार दिलीप सोपल यांच्या गटाला मात्र नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तालुक्यातील पानगाव ग्रामपंचायतीच्या एकूण १५ जागांपैकी तब्बल ११ जागा या आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाने जिंकल्या आहेत. उर्वरीत चार जागांवर माजी मंत्री सोपल यांच्या गटाने ताबा मिळविला आहे. पानगाव ग्रामपंचायत ही तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचातींपैकी एक मानली जाते. या गावातील सत्ता ही आगामी विधानसभा आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या दृष्टीने महत्वाची मानली जात आहे.
दुसरीकडे, वांगरवाडी-तावरवाडी ग्रामपंचायतीत सातही जागांवर आमदार राऊत गटाने विजय मिळविला आहे. या ठिकाणी सोपल गटाला आपले खातेही उघडता आलेले नाही. या दोन्ही गावांत मिळविलेली सत्ता राऊत यांच्यासाठी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्ठीने बूस्टर डोस ठरणार आहे. एकीकडे राज्यात मिळालेला सत्ता आणि ग्रामपंचायतीच्या सत्तेमुळे राऊत गट सध्या जोरात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.