Rajendra Patil Yadravkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rajendra Yadravkar : राजेंद्र यड्रावकरांनी महायुतीला दिला आणखी एक धक्का; आता थेट..!

Rajendra Patil Yadravkar Announced New Party : आगामी विधानसभा निवडणुकी आपण अपक्ष लढणार असल्याचे शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आधीच घोषित करून महायुतीला धक्का दिलेला आहे आणि आता...

Rahul Gadkar

Rajendra Patil Yadravkar Vs Mahayuti Politics : आगामी विधानसभा निवडणुकी आपण अपक्ष लढणार असल्याचे शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घोषणा करत महायुती खास करून शिवसेना शिंदे गटाला धक्का दिला होता.

आता दुसरा धक्का यड्रावकर यांनी महायुतीला दिला आहे. स्वतंत्र पक्षाची घोषणा करत निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळवून घेतली आहे. नुकतीच त्याला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली असून राजर्षी शाहू आघाडी या पक्षाकडून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. नवीन पक्षाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी साखर पेढे आणि फटाक्याची आतिशबाजी करत जल्लोष केला आहे.

जयसिंगपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या राजर्षी शाहू विकास आघाडीचे अध्यक्ष संजय पाटील यड्रावकर(Rajendra Patil Yadravkar) यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्याकडे नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. प्रस्तावित केलेल्या राजर्षी शाहू विकास आघाडी या राजकीय पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मंजुरीचे पत्र मंगळवारी प्राप्त झाले आहे.

राजर्षी शाहू विकास आघाडीला यापुढे स्थानिक विकास संस्थां बरोबरच विधानसभा निवडणुकीसाठी(VidhanSabha Election) देखील उमेदवारांना नामनिर्देशित करता येणार आहे, संविधानाचा आदर राखून सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन जनहिताचे काम करणे, सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे आणि विकासाला चालना देणे राजर्षी शाहू विकास आघाडी समोर ही प्रमुख उद्दिष्टे असणार आहेत. असे यावेळी संजय पाटील यड्रावकर यांनी सांगितले.

दरम्यान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे याच आघाडीतून शिरोळ मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. या मतदारसंघातून भाजपने(BJP) उमेदवारीसाठी मागणी केली आहे. मात्र आमदार यड्रावकर यांनी आतापासूनच या मतदारसंघातून दबाव वाढवला असून महायुतीची अडचण निर्माण केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT