Rajendra Patil Yadravkar : शिरोळमध्ये महायुतीची गोची, अपक्षाला साथ देणार की भाजपला पाठिंबा?

Rajendra Patil Yadravkar Kolhapur News : आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या अपक्ष राहणार या घोषनेने भाजप मधील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांनी थेट शिरोळमधून निवडणुकीत लढवण्याची मागणी केली आहे.
Rajendra Patil Yadravkar
Rajendra Patil YadravkarSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघात महायुतीची गोची आगामी विधानसभा निवडणुकीत वाढणार नाही. उमेदवारी कोणाला द्यायची यावरून चांगलीच अडचण निर्माण होणार असून अपक्षाला साथ द्यायची का? स्वतंत्र उमेदवार द्यायचा? असा पेच महायुतीसमोर निर्माण होणार आहे. विद्यमान आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे सहयोगी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar) यांच्या अपक्ष राहणार या घोषनेने भाजप मधील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांनी थेट शिरोळमधून निवडणुकीत लढवण्याची मागणी केली आहे.

शिरोळ विधानसभा मतदारसंघातील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात होते. राष्ट्रवादीची छुपी मदत घेऊन यड्रावकर विजयी झाले. महाविकास आघाडीच्या काळात त्यांनी अडीच वर्षे राज्यमंत्रीपद भूषविले. पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. तर नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात आगामी विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याची घोषणा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केली आहे.

Rajendra Patil Yadravkar
Mehboob Shaikh: संजय मामांना आस्मान दाखवायचं का, मामागिरी बंद करायची का?

सध्या शिरोळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून एक उमेदवार इच्छुक आहे. तर शिवसेना ठाकरे गटाकडून आणि राष्ट्रवादी (NCP) कडून तीन पेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवार असल्याने यंदाची निवडणूक अधिक चर्चेची बननणार आहे. शिवाय महायुतीचे सदस्य असलेले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे महायुतीतील उमेदवारी ही भाजपकडून जिल्हा परिषदेचे सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर (Rajvardhan Naik Nimbalkar) यांनी मागणी केली. तर भाजप नेते माधवराव घाटगे हे देखील भाजपकडे चेहरा आहे. मात्र त्यांनी यापूर्वीच त्याला नकार दिला आहे.

Rajendra Patil Yadravkar
Amol Kolhe : "खिशात पैसा जास्त झाल्यानं जनता 'मामा' बनत नाही," खासदार कोल्हेंनी संजय शिंदेंना डिवचलं; म्हणाले, "आबांशिवाय..."

त्यामुळे महायुतीची गोची शिरोळ मतदारसंघातील उमेदवारीवरून निर्माण होण्याची शक्यता आहे. जर यड्रावकर अपक्ष म्हणून राहिल्यास या मतदार संघात भाजप (BJP) किंवा शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार द्यावा, असा जोर धरला आहे. तशी मागणी राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com