Dhananjay Mahadik rajesh Kshirsagar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Video Rajesh Kshirsagar : 'कोल्हापूर दक्षिणचा आमदार शिवसेना ठरवणार' क्षीरसागरांनी ठणकावले

Rahul Gadkar

कोल्हापुरात विधानसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी दक्षिण मतदारसंघात मेळावा घेऊन भाजपला आपली ताकद दाखवून दिली आहे. भाजपने उत्तर मतदारसंघावर दावा केल्यानंतर क्षीरसागर यांनी थेट दक्षिण मतदारसंघात मेळावा घेत महाडिक कुटुंबियांना आव्हान दिले. हा मतदारसंघ भाजपचा असून माजी आमदार अमल महाडिक यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. तर खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक हे उत्तर मतदारसंघातून इच्छुक आहेत. दोन्ही जागा भाजपने मागितल्याने क्षीरसागर चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिवाय क्षीरसागर यांनी महाडिक आणि दक्षिण बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सतेज पाटील या दोघानाही शक्तिप्रदर्शन करुन आपली ताकद दाखवून दिली आहे.

कोल्हापुरात भाजप शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. कोल्हापूर उत्तर आणि दक्षिणच्या जागेवरून क्षीरसागर आणि महाडिक आमने सामने आलेत. राजेश क्षीरसागर यांनी दक्षिणेत मेळावा घेत, कोल्हापूर उत्तर तर आम्ही जिंकणारच आहोत. मात्र दक्षिणमध्ये ही आमची ताकद चांगली निर्माण झाली आहे. हा मतदारसंघ आपले म्हणणाऱ्यांचाच हा मतदारसंघ आता उरणार नाही. त्यामुळे दक्षिण देखील शिवसेनेचा आहे. शहरी भागात कुटुंब वाढल्याने दक्षिणमध्ये काही लोक राहायला आले आहेत. दक्षिण मधील लोक देखील शिवसेनेला मानणारा आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महायुती पुन्हा सत्तेत येणार हे ज्योतिषी सांगण्याची गरज नाही. उत्तर तर आम्ही जिंकणारच आहोत मात्र दक्षिणचा आमदार आम्हीच ठरवणार असल्याचे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

1989 पासून शिवसेना उत्तर मधून विधानसभा निवडणूक लढवत आहे आणि लोकसभा देखील लढवत आहे. जेव्हा जेव्हा शिवसेनेला संधी मिळाली तेव्हा मोठ्या प्रमाणात मते मिळाले आहे. 2 वेळा भाजप ला संधी मिळाली. मात्र त्यांना उत्तर बदलून निवडून येता आलेले नाही. त्यामुळे वरिष्ठ निर्णय घेतील महायुतीच्या दुधामध्ये मिठाचा खडा पडू नये, यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीमध्ये देखील शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार यांच्या विरोधात ज्या पद्धतीने टीका झाली म्हणजे उमेदवाराला डॅमेज करण्याचा प्रयत्न झाला. असा राजेश क्षीरसागर यांनी भाजप स्थानिक नेत्यांवर आरोप करत आम्ही सर्व सोडून त्यांच्यासोबत गेलेलो आहोत हे त्यांनी पाहिले पाहिजे. जे काही डॅमेज करण्याचा प्रयत्न आहे. तो वरिष्ठ पातळीवर नाही तर स्थानिक पातळीवर होत आहे, स्थानिक पातळीवर असं होत असेल तर स्थानिक पातळीवर प्रत्येक पक्षाने संयम ठेवायला हवा. म्हणून उत्तरचा आमदार शिवसेनेचा असणार मात्र दक्षिण मधील आमदार शिवसेनाच ठरवेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT