rajiv Gandhi Birth Anniversary  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rajiv Gandhi Birth Anniversary: 31 वर्षांत पहिल्यांदाच दिवंगत आमदार पी एन पाटलांविना सद्भावना दौड...

Sadbhavna Race in Kolhapur : 31 वर्षात यंदा पहिल्यांदाच दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या विनाच ही सद्भावना दौड पार पडली.

Rahul Gadkar

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात आयोजित होणारी सद्भावना दौड आणि आमदार पी. एन. पाटील हे समीकरण नित्याचेच बनले आहे. अखंडितपणे 31 वर्ष ही सद्भावना दौड कोल्हापुरातून दसरा चौक ते विसपूर येथील राजीव गांधी सूतगिरणी इथपर्यंत पोहोचते. मात्र या 31 वर्षात यंदा पहिल्यांदाच दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या विनाच ही सद्भावना दौड पार पडली. अत्यंत साध्या पद्धतीने ही दौड आज रवाना झाली.

माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी कोल्हापुरात सद्भावना दौड आयोजित केली जाते. काँग्रेसचे (Congress) दिवंगत आमदार पी. एन.पाटील हे सद्भावना दौडचे आयोजन करत असत. मात्र 31 वर्षात पहिल्यांदाच पी. एन. पाटील (P N Patil) यांच्या अनुपस्थित ही दौड पार पडली. खासदार शाहू महाराज आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते या दौडला सुरूवात झाली.

कोल्हापूरच्या दसरा चौकातून सुरू झालेली ही दौड इस्पुर्ली येथील राजीव गांधी सूतगिरणीपर्यंत गेली. त्याठिकाणी फोटो पूजन करून सद्भावना दौडची सांगता झाली. आज दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांची उणीव भासत असून त्यांनी सुरू केलेली ही दौड अखंडपणे सुरू ठेवणार असल्याचं पी एन पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांनी म्हटले आहे.

यंदा प्रथमच 31 वर्षात दिवंगत आमदार पी एन पाटील यांची कमी या सद्भावना दौड मध्ये जाणवत आहे. काँग्रेस विचार महत्त्वाचा आहे. त्यांनी तो विचार आजवर जिल्ह्यात टिकवला आहे. काँग्रेसचे विचार टिकून राहण्यासाठी असे कार्यक्रम अखंडपणे सुरू ठेवलं जातील असे मत आमदार ऋतुराज पाटील (Ruturaj Patil) यांनी व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT