Kagal Assembly Election 2024: घाटगे गोरगरिबांच्या तर मुश्रीफ जनतेच्या दारात; कागलमध्ये प्रचाराची चुरस वाढली

Maharashtra Assembly Election Hasan Mushrif Samarjeet Ghatge: माजी आमदार संजय घाटगे, माजी खासदार संजय मंडलिक यांनी पाठिंबा दिल्याने समर्जीत घाटगे यांची कोंडी निर्माण झाली आहे. तरीदेखील घाडगे यांनी आपला एकाकी प्रचार सुरु ठेवला आहे.
Hasan Mushrif, Samarjit Ghatge
Hasan Mushrif, Samarjit GhatgeSarkarnama
Published on
Updated on

कागल विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने (Kagal Assembly Constituency) प्रचाराला चांगली चुरस निर्माण झाली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) विरुद्ध भाजपचे नेते समर्जीत घाटगे (Samarjeet Ghatge)यांचा उघड उघड संघर्ष अटळ आहे. महायुतीतून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने घाटगे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी ठेवली आहे.

मुश्रीफ यांना महाविकास आघाडीतील नेते माजी आमदार संजय घाटगे, माजी खासदार संजय मंडलिक यांनी पाठिंबा दिल्याने समर्जीत घाटगे यांची कोंडी निर्माण झाली आहे. तरीदेखील घाडगे यांनी आपला एकाकी प्रचार सुरु ठेवला आहे. जनमानसात जाऊन त्यांनी आपली छबी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

एकीकडे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे वैद्यकीय सेवा देताना गोरगरिबांच्या मनात छबी निर्माण करत आहेत. दुसरीकडे घाटगे हे जनतेच्या दारात जाऊन आपुलकीने संवाद साधत घर निर्माण करीत आहे. त्यामुळे निवडणुकीची अद्याप घोषणा झाली नसली तरी या मतदारसंघात प्रचारामध्ये अत्यंत चुरस निर्माण झाली आहे.

प्रचाराच्या निमित्त भाजपचे नेते आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत सिंह घाटगे हे मुरगुड परिसरातील शिंदेवाडी गावात खुराडे कुटुंबियांना नुकतेच भेटले. दोन ते तीन वर्षांपूर्वी खुराडे कुटुंबातील कृष्णाबाई नामदेव खुराडे या जवळपास 103 वर्षाच्या आज्जी कृष्णाबाई नामदेव खुराडे यांची घाटगे यांनी भेट घेतली.

Hasan Mushrif, Samarjit Ghatge
Rajya Sabha Election: अजितदादा शब्द पाळणार? राज्यसभेसाठी नितीन पाटलांचे नाव निश्चित...

आपुलकीने त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांच्याशी संवाद साधला. दोन वर्षांपूर्वी घाटगे यांनी कृष्णाबाई खुराडे यांचा 101 वा वाढदिवस स्वतः घरी जाऊन साजरा केला होता. हीच ओळख ठेवून कृष्णाबाई खुराडे यांनी घाटगे यांची आठवण काढल्यानंतर घाटगे हे स्वतः त्यांच्या घरात जाऊन तब्येतची विचारपूस केली.

घाटगे हे केवळ सभा आणि भेटीगाठी घेत नसून तर गोरगरिबांच्या थेट घरात जाऊन कुटुंबियांशी संवाद साधत आहेत. व्यक्तिगत गाठीभेटीवर घाटगे यांनी भर दिला असून आगामी विधानसभा निवडणुकीत बळ देण्याची आवाहन गोरगरीब जनतेला केले आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील गाव खेड्यावर आपली नजर ठेवत वारकरी बंधूंशी संपर्क ठेवला आहे. जनतेसोबत नाते ठेवत आरोग्यसेवा पुरवताना मुश्रीफ कोणतीच कसर ठेवत नसल्याचे दिसून येत आहे. सध्या मुश्रीफ यांनी गाव पातळीवर मिळावी सुरू केले आहेत. नुकताच मुश्रीफ यांना पुन्हा आमदार करण्यासाठी वारकरीचा एक ग्रुप पंढरपुरासाठी रवाना झाला आहे. विठ्ठलाला साखळी घालून तो पुन्हा कागलमध्ये येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com