Kolhapur News: आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने शनिवारी (ता.27) एकत्र येत तिसऱ्या आघाडीची स्थापना केली. राजर्षी शाहू आघाडी या नावाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील. वंचित बहुजन आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष अरुण सोनवणे, आम आदमी पक्षाचे नेते संदीप देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी सतेज पाटील (Satej Patil) यांच्यावर सडाडून टीका केली आहे. दरम्यान, या आघाडीकडून पहिल्या 21 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला आम्ही सर्व कार्यकर्ते राबलो. पण सतेज पाटील महाविकास आघाडीत एकाधिकारशाही चालवली आहे. आघाडीसाठी खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्याशी चर्चा केली. पण त्यांना देखील सतेज पाटलांची भूमिका आवडली नाही. त्यामुळे स्वतः महाराजांनी आम्हाला सांगितले की, तुम्ही तुमच्या भूमिकेने जावा. सतेज पाटलांनी खासदार श्रीमंत शाहू महाराज यांचेही ऐकले नाही. असेही म्हणता येईल.
मी म्हणेल ते पूर्व ही काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका आहे . एक व्यक्ती कोल्हापूरला(Kolhapur) आणि इंडिया आघाडीला चुकीच्या मार्गाला नेत आहे असा आरोप व्ही. बी. पाटील यांनी केला. आम आदमीला 25, राष्ट्रवादी काँग्रेस sp 25 आणि वंचित बहुजन आघाडीला 31 जागांचा फॉर्म्युला ठरला
राजर्षी शाहू आघाडीचे उमेदवार
आम आदमी उमेदवार
प्रभाग 2-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला: उषा गणपती वडर (आप)
प्रभाग 5-नागरिकांचा मागास प्रवर्ग: समिउला उर्फ समीर लतिफ
प्रभाग 8- सर्वसाधारण महिला: दीप्ती अनिकेत जाधव
प्रभाग 13 सर्वसाधारण: मोईन इजाज मोकाशी
प्रभाग 17-नागरिकांचा मागास प्रवर्ग: प्रसाद विजय सुतार
प्रभाग 18 -नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला: अश्विनी सूरज सुर्वे
प्रभाग 18 -सर्वसाधारण: डॉ. कुमाजी गजानन पाटील
प्रभाग 2 -सर्वसाधारण: मकरंद अरुण जोंधळे
प्रभाग 6- सर्वसाधारण महिला : धनश्री गणेश जाधव
प्रभाग 16- नागरिकांचा मागास प्रवर्ग: गणेश चंद्रकांत नलवडे
प्रभाग 17- सर्वसाधारण महिला: रंजिता नारायण चौगुले
प्रभाग 19- अनुसूचित जाती: दिनकर लक्ष्मण कांबळे
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला: रूपाली अमोल बावडेकर
प्रभाग 20- नागरिकांचा मागास प्रवर्ग: हर्षल हरिदास धायगुडे
प्रभाग 3 - सर्वसाधारण: आकाश शामराव कांबळे
प्रभाग 11- अनुसूचित जाती महिला पायल सागर कुराडे
प्रभाग 13- अनुसूचित जाती महिला: राजश्री गणेश सोनवणे
प्रभाग 14-सर्वसाधारण: देवेंद्र विठ्ठल कांबळे
प्रभाग 18- सर्वसाधारण: अमित पांडुरंग नागटिळे
प्रभाग 16- सर्वसाधारण: राहुल विठ्ठल सोनटक्के
प्रभाग 17-सर्वसाधारण प्रवीण अर्जुन बनसोडे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.