Gangster Andekar News: कुख्यात गुंड बंडू आंदेकरनं उमेदवारी अर्ज भरलाच नाही, धक्कादायक माहिती समोर

PMC Election 2026: बंडू आंदेकरने प्रसारमाध्यमांच्या कॅमेरांसमोर घोषणाबाजी करत चमकोगिरी करण्याचा प्रयत्न केला. भवानी पेठेतील अरुण कुमार वैद्य स्टेडियममध्ये तो घोषणा देत निवडणूक कार्यालयात गेला. निवडणूक कार्यालयाच्या मुख्य गेटमधून आत येताच नेकी का काम आंदेकर का नाम अशा घोषणांना बंडू आंदेकरने सुरुवात केली.
Bandu Andekar to Contest PMC Election
Bandu Andekar to Contest PMC ElectionSarkarnama
Published on
Updated on

Pune News: आयुष कोमकर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला आंदेकर टोळीचा म्होरक्या कुख्यात गुन्हेगार बंडू आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सून सोनाली वनराज आंदेकर हे तिघे पोलिस बंदोबस्तात भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले. पण त्यांचे अर्ज अर्धवट भरलेले असल्याने ते स्वीकारण्यात आले आले नाहीत. ते तिघे आता सोमवारी (ता. 29) पुन्हा अर्ज भरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ‘नेकी का काम, आंदेकर का नाम’, ‘आंदेकरांना मत, विकासाला मत’ अशी घोषणाबाजी बंडू आंदेकरने (Bandu Andekar) केली. या तिघांना अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली. त्यानुसार शनिवारी दुपारी पोलिस बंदोबस्तात अर्ज दाखल केला.

बंडू आंदेकरने प्रभाग क्रमांक 24 कसबा पेठ-कमला नेहरू रुग्णालय-केएमई येथून तर लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकरने प्रभाग क्रमांक 23 रविवार पेठ-नाना पेठ येथून अर्ज भरल्याची चर्चा होती. पण या तिघांचेही अर्ज अर्धवट असल्याने त्यांचे अर्ज स्वीकारले नाहीत.

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे म्हणाले, या तिघांचे अर्ज अर्धवट असल्याने त्यांचे अर्ज स्वीकारण्यात आलेले नाहीत. अर्ज भरण्यासाठी मुदत असल्याने ते पुन्हा अर्ज भरू शकतात.

Bandu Andekar to Contest PMC Election
Solapur Election News: एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चा, तिकडे सोलापुरात अजितदादांचा शरद पवारांनाच मोठा धक्का

न्यायालयाने आयुष कोमकर हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या बंडू आंदेकरसह माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकरांना आगामी पुणे महापालिका निवडणूक (PMC) लढण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, मिरवणूक, भाषण किंवा घोषणाबाजी करण्यास न्यायालयाने स्पष्ट मनाई केली आहे.

पुणे महापालिका निवडणुकीत आंदेकर कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार की अपक्ष लढणार याकडं सर्वांचंच लक्ष लागलं होतं.यापूर्वीच्या निवडणुकीत आंदेकर कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाशी संबंधित राहिलं आहे.

Bandu Andekar to Contest PMC Election
Khopoli murder case : शिलेदाराची भररस्त्यात हत्या अन् एकनाथ शिंदेंची सावध प्रतिक्रिया,तर तटकरेंनी कर्जत गाठत कार्यकर्त्यांची बाजू घेताना 'SIT'च्या मागणीची घोषणा!

आंदेकर कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसही सकारात्मक असल्याची चर्चा होती. मात्र, शनिवारी अर्ज भरताना तिघांनाही राष्ट्रवादीने एबी फॉर्म दिला नव्हता. त्यामुळे अपक्ष अर्ज दाखल केले आहेत.

बंडू आंदेकरने प्रसारमाध्यमांच्या कॅमेरांसमोर घोषणाबाजी करत चमकोगिरी करण्याचा प्रयत्न केला. भवानी पेठेतील अरुण कुमार वैद्य स्टेडियममध्ये तो घोषणा देत निवडणूक कार्यालयात गेला. निवडणूक कार्यालयाच्या मुख्य गेटमधून आत येताच नेकी का काम आंदेकर का नाम अशा घोषणांना बंडू आंदेकरने सुरुवात केली.

Bandu Andekar to Contest PMC Election
Pune BJP News : भाजपचा पुण्यात मोठा डाव, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा मुलगाच फोडला; प्रशांत जगतापांविरोधातला 'चेहरा' ठरला?

बघा बघा मला लोकशाहीत कसं आणलंय, मी उमेदवार आहे दरोडेखोर नाही, असे म्हणत त्याने सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. तसेच आंदेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत, वनराज आंदेकर जिंदाबाद अशाही घोषणा त्याने यावेळी दिल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com