Radhakrishna Vikhe Patil -Raju Khare Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Khare : ‘विखेसाहेब...आपण अनगरला अप्पर तहसील कार्यालय दिलं, म्हणून मी आमदार झालो’; राजू खरेंचा टोमणा

Angar Upper Tehsil Office : राधाकृष्ण विखे पाटील हे अतिशय वजनदार माणूस आहेत. त्यांनी अवघ्या 9 दिवसांत सरकार पळवून त्यांनी अनगरला अप्पर तहसील कार्यालय दिलं होतं.

विश्वभूषण लिमये

Solapur, 03 January : मागील सरकारमध्ये महसूलमंत्री असताना राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी अवघ्या नऊ दिवसांत अनगरला तत्परतेने अप्पर तहसील कार्यालय मंजूर केले होते. त्याची आठवण करून देण्यासाठी मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांनी खास काळी कपडे घालून नूतन जलसंपदा मंत्री विखे पाटलांचा सत्कार केला. ‘आपण अनगरला अप्पर तहसील कार्यालय दिलं; म्हणून मी आमदार झालो,’ असे त्यांना आपण ठणकावून सांगितल्याचेही खरे यांनी नमूद केले.

निवडणुकीच्या तोंडावर मोहोळ तहसील कार्यालयाचे विभाजन करून अनगरला अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्यात आले होते. त्याविरोधात मोहोळमध्ये (Mohol) सर्वपक्षीय नेतेमंडळी एकत्र आले होते. मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अनगर अप्पर तहसील कार्यालय कळीचा मुद्दा ठरला होता. त्याच मुद्यावर राजू खरे (Raju Khare) हे मोहोळचे आमदार झाले आहेत.

दरम्यान, नागपूरमध्ये नुकतेच झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यानही आमदार राजू खरे यांनी काळे कपडे घालून अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या निर्णयाचा निषेध केला. विधानसभेच्या प्रवेशद्वारावर त्यांनी याबाबतचे आंदोलन केले होते.

उजनी धरण कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या बैठकीला येताना मोहोळचे आमदार राजू खरे यांनी काळा ड्रेस परिधान केला होता. त्याचे कारणही आमदार राजू खरे यांनी स्पष्ट केले, विशेष म्हणजे खरे यांनी काळा ड्रेस घालूनच मंत्री विखे पाटील यांचा सत्कारही केला.

राजू खरे म्हणाले, राधाकृष्ण विखे पाटील हे मागच्या वेळी महसूल मंत्री होते. त्यांनी अवघ्या 9 दिवसात अनगरला तत्परतेने अप्पर तहसील कार्यालय दिलं, त्यामुळे त्यांना जाणीव करून देण्यासाठी काळे कपडे घालून आलो होतो. राधाकृष्ण विखे पाटील हे अतिशय वजनदार माणूस आहेत. त्यांनी अवघ्या 9 दिवसांत सरकार पळवून त्यांनी अनगरला अप्पर तहसील कार्यालय दिलं होतं.

अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधात मोहोळच्या जनतेचा उद्रेक झाला आणि राजू खरेला विधानसभेत पाठवलं. त्याचीच आठवण करून देण्यासाठी आज मी काळे कपडे घालून विखे पाटलांचा सत्कार केला. आणि त्यांना सांगितलंही की, ‘आपण अनगरला अप्पर तहसील कार्यालय दिलं; म्हणून मी आमदार झालो,’ असेही आमदार खरे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT