
Solapur, 03 January : काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना सोलापूर जिल्ह्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपद मिळाले. पण, आता भारतीय जनता पक्षाचे सोलापूरमधील नेतृत्व हे अकार्यक्षम आहे, त्यामुळेच कोणालाही मंत्रिपद मिळालेलं नाही. एकही मंत्रिपद न मिळणे हे सोलापूरचे दुर्दैव आहे, अशा शब्दांत खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर टीकास्त्र सोडले.
महायुती सरकारमध्ये सोलापूरला (Solapur) मंत्रिपद न मिळाल्याने खासदार शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला जबाबदार धरले आहे. प्रणिती शिंदे म्हणाल्या, सोलापूरला एकाच वेळी मुख्यमंत्रिपद आणि उपमुख्यमंत्रिपद मिळाले होते. मात्र, भाजप सरकारच्या काळात गेली दहा वर्षांपासून सोलापूर एक मंत्रिपद मिळू शकलेले नाही.
मागील सरकारच्या काळात तुम्ही बघा जर पाच महिन्याला सोलापूरचा पालकमंत्री बदललेला आहे, असा दावाही प्रणिती शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, सोलापूरला मंत्रिपद न मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्येही नाराजीची भावना आहे. त्यावरच खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी बोट ठेवले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही निवडणुकीसाठी चुनावी जुमला होता. त्यांनी तो व्यवस्थित खेळला. लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र दिवाळखोर झाला आहे असा रिपोर्ट येत आहे. इतर योजनांचे पैसे थांबवले आहेत, तिजोऱ्या रिकाम्या पडल्या आहेत. लाडकी बहीण आतुरतेने वाट पाहत आहे, तिला सावत्र करू नये, असा सल्लाही प्रणिती शिंदे यांनी दिला.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, आज पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र मागे पडला आहे. महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार वाढत आहेत. दिनदलित आणि अल्पसंख्याक यांच्यावर हल्ले होत आहेत. दिवसाढवळ्या सरपंचांचे खून होत आहेत. बीड, परभणी, बदलापूर ही प्रकरण वाढत चालली आहेत. भाजपची सत्ता देशात आणि राज्यात आल्यापासून कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे.
पोलिसांची कोणालाही भीती राहिली नसून कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न होत आहेत. स्वतः मुख्यमंत्री हे अशा प्रकरणांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. परभणीच्या प्रकरणात मुख्यमंत्री विधानसभेत रेकॉर्डवर म्हणाले की, मृत्यू हर्टअटॅकमुळे झाला आहे, तर पोस्ट मार्टमच्या रिपोर्टमध्ये मारहाणीमुळे मृत्यू झाला आहे, असं म्हटलं आहे, असेही शिंदे यांनी नमूद केले.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, महाराष्ट्रात आज कोणीही सुरक्षित राहिलेले नाही, त्यामुळे बोलण्यात तफावत दिसून येत आहे. एकीकडे हे प्रकार असताना सत्ता आणि कोणाला कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळणार याकडे लक्ष केंद्रीत होत आहे. याबाबत मी मुख्यमंत्र्यांचा निषेध करत आहे. महाराष्ट्राला पुन्हा एकदा पुरोगामी पथावर आणण्याची जबाबदारी ही नागरिकांची आहे. कारण, राज्याकर्त्यांकडून आता फारशा अपेक्षा राहिलेल्या नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.