Sangali News : सांगली जिल्ह्यातील सात लाख ऊस उत्पादक शेतकरी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील आणि माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्यावर नाराज आहेत. दोघांनी मिळून पैसे द्यायचे नसल्याचे ठरवले आहे. पैसे न देता ऊस तोडणार असे म्हणत असतील तर त्यांचा अहंकार ठेचून काढू , असा इशारा स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज सांगलीत दिला.
सांगलीतील दत्त इंडिया कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माजी खासदार शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक आंदोलन केले, यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सांगली जिल्ह्यात सोळा साखर कारखाने आहेत. त्यापैकी जयंत पाटील आणि विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वात ११ कारखाने चालतात. दोघांनी मिळून जिल्ह्यातील शेतकर्यांना पैसे न देण्याची भूमिका घेतली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
संघटनेचे आंदोलन चिरडून टाकण्याचा त्यांच्यात अहंकार निर्माण झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत जो समझोता झाला आहे, तो सांगली जिल्ह्यात लागू करण्याची मागणी आहे. सांगली-कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती एकसारखी आहे. परंतु दोन्ही नेत्यांच्या अहंकारापोटी शेतकर्यांचे नुकसान होत आहे. पैसे न देता ऊस तोडणार, अशी भूमिका त्यांची दिसते. मात्र वेळ पडल्यास त्यांचा अहंकार ठेचून काढला जाईल.
साखराळे, वाटेगाव आणि सर्वोदय युनिटची एफआरपी 3212 रुपयांपेक्षा जादा आहे. सोनहिरा कारखान्याची 3269 रुपये एफआरपी बसते. मात्र त्यांनी शेतकर्यांना जास्त पैसे न देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘माझी मान खाली झाली तर चालेल, माझा अपमान होवू दे’ पण, आम्ही मागणी केल्याप्रमाणे कोल्हापूर फॉर्म्युल्याप्रमाणे शेतकर्यांना पैसे द्यावेत.
एक डिसेंबर रोजी राजारामबापू कारखान्यावर ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी 6-7 दिवस वेळ देण्याची मागणी केली होती. जिल्हा प्रशासनाने मागून घेतलेली मुदत संपली तरी बैठकीचा पत्ता नाही. जिल्हाधिकारी फोनही घेत नाहीत. एक तर जिल्हाधिकारी कारखानदारांना सामील झाले आहेत. अथवा कारखानदारांच्या दादागिरीसमोर त्यांचे काही चालत नाही, असे स्थिती दिसते. काहीही असले तरी जिल्हाधिकारी सपशेल खोटे बोलले, त्यामुळे पुन्हा काटा बंद आंदोलन घ्यावे लागल्याचे माजी खासदार शेट्टी यांनी सांगितले.
सरकारकडून शेतकरी वार्यावर
द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले असताना सरकारने शेतकर्यांना वार्यावर सोडल्याची टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. अवकाळीने द्राक्ष बागांचे शंभर टक्के नुकसान झाले. त्यामुळे तो उध्वस्त झाला आहे. त्या शेतकर्यांचे शंभर टक्के कर्ज माफ झाले पाहिजे. 2019 मध्ये आलेल्या महापुराच्या काळात कर्जमाफी देण्यात आली, त्या धर्तीवर निर्णय घ्यावा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.