Cricketnama 2023 : नागपुरात 'क्रिकेटनामा'चा माहोल,शिंदेंचे कॅप्टन उदय सामंत कोणाची विकेट काढणार ?

Shinde's captain Uday Samant : सोमवारी संत्रानगरीत राजकीय पक्षाच्या टीम्स देणार तुंबळ लढती
Uday Samant
Uday Samantsarkarnama
Published on
Updated on

Nagpur News :  पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी (नागपूर) : अवकाळी पावसाच्या रिपरिपीनंतर उपराजधानीत वाढलेल्या थंडीत आता 'क्रिकेटनामा'चा माहोल नागपुरात चांगलाच तापणार आहे. सोमवारपासून (ता. 11) राजकीय नेत्यांच्या टीम्स 'क्रिकेटनामा'ची ट्रॉफी पटकावण्यासाठी एकमेकांना तगडे आव्हान देणार आहे. 'क्रिकेटनामा'ची ही उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांच्या टीमचे कॅप्टन उद्योग मंत्री उदय सामंत राहणार आहेत.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर महाराष्ट्रातील सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या या भव्य स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाया मंत्री सुधीर मुनगंटीवार स्पर्धेचे स्वागताध्यक्ष आहेत. भाजपचे माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके हे निमंत्रक आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uday Samant
MNS vs Shinde Group News : शिंदे गटातील मोठा पदाधिकारी फेरीवाल्यांकडून हप्ते घेतो; मनसे आमदार देणार पुरावा !

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असताना सकाळ माध्यम समूहाच्या 'सरकारनामा'च्या वतीने 'क्रिकेटनामा'चे आयोजन होणार आहे, 11 व 12 डिसेंबर रोजी. ही स्पर्धा विदर्भात पहिल्यांदाच होऊ घातली आहे. नागपूर येथील मेकोसाबाग परिसरातील मेथोडीस्ट हायस्कूलच्या प्ले-ग्राऊंड येथील श्लालोम स्पोर्ट्स ग्राऊंड परिसरातील पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी येथे या स्पर्धेतील भव्यदिव्य लढती होणार आहेत.

हिवाळी अधिवेशनात काळात एकत्र येणाऱ्या मंत्री, आमदारांतील खिलाडूवृत्ती हेरण्याच्या उद्देशाने आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतींकडं लक्ष वेधण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'सेनेचे' फलंदाज व गोलंदाज विजयासाठी झुंज देणार आहेत.

Uday Samant
Cricketnama 2023 : संतोष दानवेंच्या नेतृत्वाखाली भाजपचा संघ `किंग` ठरणार का?

राष्ट्रवादीची टीम प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात मैदानावर उतरणार आहे. नव्या राष्ट्रवादीची अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संघ त्यांना रोखण्यासाठी सज्ज झालाय. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपल्या पक्षाचे अष्टपैलू खेळाडू मैदानात उतरविणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपची टीम या स्पर्धेत वरखेड करण्यासाठी सज्ज झालीय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची यांच्या नेतृत्वातील टीम मैदान मारण्यासाठी संघर्ष करणार आहे. बच्चू कडूंचाही संघ मैदानावर प्रतिस्पर्धी खेळाडूंवर 'प्रहार' करणार आहे.

Uday Samant
विखेंनी एकाच दमात सगळं उरकलं | Radhakrishna Vikhe on Maratha Reservation |

क्रीडानगरी सज्ज

सरकारनामा’च्या ‘क्रिकेटनामा’ स्पर्धेसाठी संत्रानगरी नागपूर सज्ज झाली आहे. मेकोसाबाग येथील मेथोडीस्ट हायस्कूलच्या प्ले-ग्राऊंड येथील श्लालोम स्पोर्ट्स ग्राऊंडवरील पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी येथे ही स्पर्धा होणार आहे.

Uday Samant
Cricketnama 2023 : नागपूर अधिवेशनात 'क्रिकेटनामा'चा ज्वर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com