Raju shetti - Chandrakant Patil
Raju shetti - Chandrakant Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राजू शेट्टी - चंद्रकांत पाटील यांची 'ती' गुप्त भेट झाली का?

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatna) अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju shetti) हे मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीवर (Mahavikas Aaghadi) नाराज आहेत. त्यामुळे ते आघाडीची साथ सोडण्याची शक्यता आहे. पण भविष्यातील काहीही राजकीय निर्णय घ्यायचा असल्यास ५ तारखेच्या कार्यकारणीमध्ये घेवू असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अशातच भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि राजू शेट्टी यांची गुप्त भेट झाल्याच्या बातम्यांनी राजकीय क्षेत्रात घडामोडींना वेग आला आहे.

कोल्हापूरमध्ये काल भाजपचे नेते समरजीत घाटगे, माजी खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार सुरेश हळवणकर यांची राजू शेट्टी यांच्याशी भेट झाली. 'कोल्हापूर उत्तर'मधील पोटनिवडणुकीबाबत ही भेट होती. यानंतर आज कोल्हापुरमध्ये शेट्टी-पाटील यांच्या भेटीच्या बातम्यांनी राजकीय क्षेत्रात चर्चांना सुरुवात झाली. मात्र अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे राजू शेट्टी यांनी 'सरकारनामा' शी बोलताना स्पष्ट करत भेटीचे वृत्त फेटाळून लावले आहे.

राजू शेट्टी म्हणाले, पुरग्रस्तांचे प्रश्न, दोन टप्प्यांमधील एफआरपी, वीज तोडणी आणि वसुली अशा विविध मागण्यांसाठी आम्ही लढा देत आहोत. पण सत्तेत राहूनही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत. मात्र अद्याप महाविकास आघाडी सोडण्याचा निर्णय झालेला नाही. आघाडी सोडायची का? भाजपसोबत जायच का? याबाबतचे निर्णय ५ तारखेला राज्य कार्यकारणीमध्ये होतील. याशिवाय आघाडी सोडायची याचा अर्थ भाजपसोबत जायचा असं होतं नाही. कारण शेतकऱ्यांसाठीची भाजपची धोरणं अनुकूल असती तर आम्ही त्यांना सोडलचं नसतं, असेही त्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट केले.

काल चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना राजू शेट्टी आमच्यासोबत आले तर आम्ही त्यांचे स्वागतच करु अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर बोलताना आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझी याबाबत काही चर्चा झाली नाही. पण ते यापूर्वी आमच्यासोबतच होते. काही कारणाने ते पलिकडे गेले. आता सोबत कोण येणार, कोण येणार नाही याबाबत पूर्ण माहिती घेवूनच प्रतिक्रिया द्यावी लागेल. मात्र मागच्या काही काळात जेवढे निर्णय पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी घेतले तेवढे कोणीही घेतलेले नाहीत. पण मी अद्याप राजू शेट्टी यांच्याबाबत माहिती घेतलेली नाही. असेही फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT