'एमआयएम'-महाविकास आघाडी युती होणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले...

Sanjay Raut | Shivsena | MIM | Mahavikas aaghadi : MIM पक्षाने महाराष्ट्रात भाजपला हरवण्यासाठी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिली
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : MIM पक्षाने महाराष्ट्रात भाजपला (BJP) हरवण्यासाठी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिली आहे. यावरुन मोठ्या चर्चा सुरु असताना आणि भाजपकडून शिवसेनेवर टीका होत असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार आणि तीनच पक्षांचे राहिलं. यात चौथा, पाचवा याला काही अर्थ नाही.

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांवर आणि आदर्शांवर चालणारे पक्ष आहेत. अशात जर कोणत्या पक्षाचा नेता औरंजेबाच्या कबरीवर जावून डोक टेकत असेल आणि ते महाराष्ट्राचे आणि शिवसेनेचे आदर्श होणार नाहीत. त्यामुळे युती होणार असल्याच्या सर्व अफवा आहेत, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले.

Sanjay Raut
गुन्हा दाखल होताच IPS अधिकारी न्यायालयात; मुंबईत पोलिसांची स्वतःच्या बचावासाठी धडपड

एमआयएमने सांगितले की आता पर्यंत आम्हाला भाजपची बी टीम म्हणून ओळखल जात आहे. यावर माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, एमआयएम हे भाजपची बी टीमच आहेत. हे उत्तरप्रदेश आणि बंगालमध्ये आम्ही पाहिलं आहे, सिद्ध झालं आहे. त्यामुळे आमचे स्पष्ट मत आहे, ज्यांचे आदर्श औरंगजेब आहेत, मग ते कोणीही असतील ते महाराष्ट्राचे आणि शिवसेनेचे आदर्श होणार नाहीत. अशा पक्षांशी महाविकास आघाडीचा कोणताही संबंध येणार नाही, येवू शकत नाही. त्यांच्याशी आमची कोणतीही छुपी किंवा उघड युती होवूच शकत नाही. ज्यांच्याशी त्यांची छुपी युती आहे ती त्यांची त्यांना लखलाभ असे म्हणत संजय राऊत यांनी हात जोडत एमआयएमशी कोणत्याही प्रकारची युती होणार नसल्याचे स्पष्ट केले.

एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला खुली ऑफर दिली आहे. तुमचं तीन चाकी सरकार आहे. त्याला आणखी एक चाक जोडून चारचाकी बनवा. आम्हाला सोबत घ्या, अशी ऑफर जलील यांनी महाविकास आघाडीला दिली आहे. माझा निरोप वरिष्ठांपर्यंत पोहोचवा, असे त्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com