Raju Shetti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti News : मी तुमच्या शेतातील म्हसोबा, मला...; राजू शेट्टींचं शेतकऱ्यांना साकडं

Hatkanangle Lok Sabha Constituency : राजू शेट्टींनी महाविकास आघाडीच्या पाठिंब्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंसह इतर नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मात्र, त्यात त्यांना अपयश आले. त्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे हातकणंगलेतून लढण्याचा निर्णय घेतला.

Sunil Balasaheb Dhumal

Hatkanagle Political News : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, महाविकास आघाडीचे सत्यजीत पाटील सरुडकर, तर महायुतीचे धैर्यशील माने अशी तिरंगी लढत होत आहे. मतदानापूर्वीच प्रत्येकाने मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी विविध चाली खेळल्या जात आहेत. जोरदार भाषणे करून मतदारांना आपल्याला मतदान करण्यासाठी आवाहन केले जात आहे. यातच शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतातील म्हसोबाचे उदाहरण देत हातकणंगलेतील लोकांना अनोख्या पद्धतीने साकडे घातले आहे. Raju Shetti appeal Farmers for vote in Lok Sabha Election.

राजू शेट्टी Raju Shetti हे शेतकरी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी मोठी आंदोलने केलेली आहेत. उसाच्या एफआरपीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांना शेट्टी थेट नडतात. आता मात्र त्यांनी मतदारांना म्हसोबाचे नाव घेत भावनिक साकडे घातले आहे. ते म्हणाले, प्रत्येकाच्या शेतात म्हसोबा असतो. तो म्हसोबा वर्षभर काही न मागता तुमच्या उसाची, शेताची राखण करतो. वर्षातून एकदाच त्याला नैवेद्य दाखवला जातो. त्याचप्रमाणे मीही तुमच्या शेतातील म्हसोबा आहे. तुम्ही मला तुमच्या एका मताच्या रूपाने परडी घाला, असे आवाहन शेट्टींनी केले आहे.

दरम्यान, राजू शेट्टींनी महाविकास आघाडीच्या MVA पाठिंब्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंसह इतर नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मात्र, त्यात त्यांना अपयश आले. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र्यपणे हातकणंगलेतून लढण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्यापुढे आता सत्यजीत पाटील सरुडकर आणि खासदार धैर्यशील माने यांचे आव्हान आहे. यावर त्यांनी माझी सामान्य जनतेवर विश्वास असल्याचे सांगून महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. Hatkanangle

हेही वाचा

राजू शेट्टींनी बैलगाडीतून येत शक्तिप्रदर्शन करत आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. त्यावेळी त्यांनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील Jayant Patil, काँग्रेसचे नेते माजी मंत्री सतेज पाटील यांच्यावर टीका केली होती. तसेच भाजपच्या केंद्रीय तापस यंत्रणांकडून होणाऱ्या कारवायामुळे भाजपचाही समाचार घेतला. शेतकऱ्यांसह यापुढे बेरोजगार आणि विद्यार्थ्यांसाठी लढा देणार असल्याचेही राजू शेट्टींनी जाहीर केले. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना म्हसोबा समजून मला मतदान करावे, असे साकडे घातले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT