Raju Shetti  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti News: 31 तासांपासून हायवे अडवला, तरीही सरकारनं ऐकलं नाही; अखेर संतापलेल्या राजू शेट्टींचा आंदोलनाबाबत मोठा निर्णय

Kolhapur News: यंदा ऊसाला साडे पाच हजार दर द्यावा अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापूर-बेळगाव हायवेवरील कोगनोळी टोल नाक्यादरम्यान आंदोलन सुरू केलं. गेल्या 31 तासांपासून त्यांचं आंदोलन सुरू आहे.

Deepak Kulkarni

Kolhapur News: यंदा ऊसाला साडे पाच हजार दर द्यावा अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापूर-बेळगाव हायवेवरील कोगनोळी टोल नाक्यादरम्यान आंदोलन सुरू केलं. गेल्या 31 तासांपासून त्यांचं आंदोलन सुरू आहे. मात्र,त्यांच्या आंदोलनाची दखल सरकारनं घेतली नसल्याचं समोर आलं होतं. माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन करण्याचा निर्णय बदलला आहे.

शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी बुधवारी(ता.14) महामार्ग रोखून धरत सुरू केलेल्या ऊसदरवाढी संदर्भातल्या आंदोलनाचा मार्ग बदलला आहे. त्यांनी आता राज्यात सुरू झालेले कारखाने बंद पाडणार असल्याची घोषणा केली आहे. यावेळी शेट्टींनी ज्यांच्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होतो आहे, त्यांना आता आम्ही त्रास देणार असल्याचंही सांगितलं.

'स्वाभिमानी'च्या या बदललेल्या भूमिकेमुळे येत्या काळात शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी यांनी कोल्हापूर-बेळगावच्या दरम्यान कोगनोळी टोल नाक्यादरम्यान आंदोलन सुरू केलं होतं.

राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांनी पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून धरत सुरू केलेल्या आंदोलनाला 31 तास उलटले आहेत. तरी सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळत नसल्यामुळे आता राज्यातील सुरू झालेले साखर कारखाने बंद पाडण्याचा निर्णय घेतल्याचं शेट्टी यांनी जाहीर केलं आहे.

याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ऊसाला साडे पाच हजारांचा हमीभाव जाहीर न करता राज्यात सुरू झालेले साखर कारखाने बंद पाडणार आहोत. कारखान्यातून एक कणही बाहेर जाऊ देणार नसल्याचा असा गर्भित इशाराही शेट्टींनी साखर कारखानदार आणि सरकारला दिला आहे.

यावेळी त्यांनी आक्रमक भूमिका जाहीर करताना जर आम्ही मागणी केलेला हमीभाव न देता साखर कारखाना कुणी सुरू केला, तर आम्ही संबंधित कारखान्यातील साखर गोरगरिबांना वाटून टाकणार असल्याचं सांगितलं.

स्वाभिमानीच्या या शेतकरी आंदोलनासाठी यापुढे दोन पथकं तैनात करण्यात आली आहे. या आंदोलनातील पहिलं पथक हुबळीच्या दिशेनं पायी रवाना होणार आहे. तेच पथक 29 ऑक्टोबरला केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराला घेराव घालणार असल्याचं बोललं जात आहे.

तर शेतकरी संघटनेचं दुसरं पथक हे शेट्टींच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात धडकणार आहे. या जिल्ह्यांमधील साखर कारखान्यानं हमीभाव जाहीर न करता गाळप सुरू केला, तर संबंधित कारखाना बंद पाडण्याचं काम पथक करणार असल्याची समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT