Supreme Court Hearing : राहुल गांधींनी चुका सुधारल्या, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी कधी? संभाव्य तारीख समोर

INDIA Alliance: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत तीव्र आंदोलन छेडलं. या आंदोलनानं राजकीय वातावरण ढवळून निघाल्यानंतर आणखी एक मोठा डाव टाकला होता.
Rahul Gandhi, Supreme Court
Rahul Gandhi, Supreme CourtSarkarnama
Published on: 
Updated on: 

New Delhi News: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत तीव्र आंदोलन छेडलं. या आंदोलनानं राजकीय वातावरण ढवळून निघाल्यानंतर आणखी एक मोठा डाव टाकला होता. राहुल यांच्यासह विरोधी पक्षांनी एकत्र येत कॉन्स्टिट्यूशन क्लब ते सर्वोच्च न्यायालय असा मार्च काढत मुख्य निवडणूक आयुक्त आणि विशेष मतदारयादी पुनर्परीक्षण विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधींसह विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीतील नेत्यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत 14 त्रुटी निघाल्या होत्या. या त्रुटींमुळे दाखल याचिकेवरील सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता होती. हा विरोधकांसाठी मोठा धक्का मानला जात होता.आता दाखल याचिकेतील रजिस्ट्रीने नमूद केलेल्या तांत्रिक चुका सुधारण्यात आल्या आहेत.

राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून सोमवारी (ता. 12 ऑक्टोबर) दाखल याचिकेत रजिस्ट्रीने 14 प्रकारच्या त्रुटी काढल्या होत्या. त्यात काही ठिकाणी प्रतिवादींच्या नावांतील चुका,काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंच्या ओळखपत्राची अस्पष्ट प्रिंट, कोर्ट फीत 220 रुपयांची कमतरता यांसह विविध त्रुटींचा समावेश होता. आता राहुल गांधींच्या लिगल टीमकडून या सर्व दुरुस्त्या बुधवारी (ता.13 ऑक्टोबर) रोजी पूर्ण करण्यात आल्या आहेत.

यानंतर आता सर्वोच्च न्यायालयात विरोधकांच्या दाखल याचिकेला रिट याचिका क्रमांक मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉम्प्युटर प्रणालीत या याचिकेची संभाव्य सुनावणी ही त 26 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचं दिसून येत आहे. सध्या नवरात्र असून पुढील आठवड्यात दसरा सण आहे. दसऱ्याच्या सुट्टीनंतर सुप्रीम कोर्टाचे कामकाज हे 26 ऑक्टोबर रोजी नियमितपणे पुन्हा सुरू होणार आहे.

Rahul Gandhi, Supreme Court
Vivekanand Patil: पुण्यातील MPSC चं आंदोलन गाजवलेल्या विवेकानंदला राज ठाकरेंचा फोन; म्हणाले, 'लढ्याला यश, आता ...'

मात्र, सर्वोच्च न्यायालय हे शुक्रवार (ता. 16 ऑक्टोबर)पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात जोर लावला तर एखाद्यावेळेस येत्या आठवड्यातही विरोधकांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेऊ शकते.

मिळालेल्या माहितीनुसार,विरोधी पक्षांकडून दाखल याचिकेसंबंधी सर्वोच्च न्यायालयातील ताजी नोंद समोर येत आहे. त्यात आता राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या याचिकाकर्त्यांची एकूण संख्या 13 वर पोहोचली आहे. ती यापूर्वी 10 होती. मात्र, याचिकाकर्त्यांच्या यादीत व्हिसीकेचे 2 आणि नॅशनल कॉन्फरन्स 1 अशा तीन नेत्यांची वाढ झाली आहे.

Rahul Gandhi, Supreme Court
Kokan Drought : फडणवीस सरकारचा पालघरसह रत्नागिरीला मोठा दिलासा; प्रत्येकी तीन तालुके दुष्काळी यादीत, 5 हजारांच्या मदतीसह मिळणार 12 सवलती

राहुल गांधी आणि इंडिया आघाडीनंतर आता एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही SIR प्रक्रियेविरोधात कायदेशीर लढाई छेडली आहे. त्यांनी निवडणूक आयोगाच्या नव्या एसआयआर प्रक्रियेविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणी निगडित पूर्वीच्या सर्व प्रलंबित याचिकांची यादी सादर करा, असे निर्देश ओवैसींच्या वकिलांना सर्वोच्च न्यायालयाने दिल्याची माहिती समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com