Raju Shetti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti News : 'तुमचा दत्ता सामंत करू...', या धमकीवर राजू शेट्टीचं मोठं विधान; म्हणाले...

Deepak Kulkarni

Kolhapur Latest News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्य सरकार आणि कारखान्यांविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यानंतर ठिकठिकाणी जाळपोळ करण्यात आली. माजी खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदारांना इशारा देत संघर्ष अटळ असल्याचे जाहीर केले आहे. याचवेळी शेट्टी यांचा दत्ता सामंत करू, अशी धमकी सोशल मीडियावर अज्ञाताने दिली आहे. यावरही त्यांनी मोठं विधान केले आहे.

माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी मंगळवारी ऊस परिषद झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी राज्य सरकारसह कारखानदारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. या वेळी त्यांनी तुमचा दत्ता सामंत करू या सोशल मीडियावर आलेल्या धमकीवरही भाष्य केले. ते म्हणाले, 22 दिवस पदयात्रेत असल्यामुळे या धमकीबाबत कल्पना नाही. मात्र, असे झाल्यास शेतकऱ्यांसाठी मी हुतात्मा झालो असे समजू, असेही शेट्टी म्हणाले.

गतवर्षी तुटलेल्या उसाला 400 रुपयांचा दुसरा हप्ता मिळावा यासाठी 522 किलोमीटरची आक्रोश पदयात्रा करून या पदयात्रेची सांगता मंगळवारी जयसिंगपुरातील ऐतिहासिक विक्रमसिंह मैदानावर झालेल्या 22 व्या ऊस परिषदेत करण्यात आली. या वेळी हजारो शेतकऱ्यांना संबोधित करताना राजू शेट्टी यांनी 400 रुपये दुसरा हप्ता मिळाल्याशिवाय जागेवरून हटणार नसल्याचा निर्धार करत पुन्हा एकदा ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

तसेच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होत नसेल तर मी ही घराकडे परतणार नाही, साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांना दुसरा हप्ता मिळवून देणारच असल्याचा निर्धार या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatna) नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.

खर्डा-भाकरी भेट देत अनोखं आंदोलन...

स्वाभिमानीच्या 22 व्या ऊस परिषदेत, एफआरपीचा शासन निर्णय तातडीने करावा, गेल्या 8 महिन्यांतील साखर विकलेले दर कारखान्यानी जाहीर करावेत, यंदाच्या गळीत हंगामाची पहिली उचल 3500 मिळावी असे काही महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आले. याचवेळी त्यांनी 12 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दिवाळीतील धनत्रयोदशी या दिवसापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी (Farmer) खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांच्या चेअरमन असलेल्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांना खर्डा-भाकरी भेट देत अनोखं आंदोलन उभारण्याचं आवाहन केलं.

22 व्या ऊस परिषदेतील महत्त्वपूर्ण ठराव :

उस उत्पादक शेतकऱ्यांना दोन टप्प्यात एफआरफी देण्याचा निर्णय रद्द करण्याचा शासन निर्णय तातडीने करावा.

शेतीपंपाचे होणारे भारनियमन त्वरित रद्द करून शेतीपंपाला विनाकपात दिवसा 12 तास वीज द्यावी. प्रलंबित वीजपंपाचे कनेक्शन ताबडतोब द्यावे. राज्य सरकारच्या जलसंपदा प्राधिकरणाने

कृषी सिंचनाच्या पाणीपट्टीचे दसपट वाढवलेला कर तातडीने मागे द्यावा.

दुष्काळाचे निकष बदतून सर्कलनिहाय ज्या ज्या सर्कलमध्ये खरिपाचे पीक वाया गेलेले आहे. उर्वरित भाग दुष्काळग्रस्त म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात जाहीर करावा.

गतवर्षी तुटलेल्या उसाची एफआरपी पूर्णपणे देऊन अधिक 400 रुपये तातडीने द्यावे.

राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे काटे तातडीने ऑनलाइन करून एकाच सिस्टिमधील सॉफ्टवेअरमध्ये काटे बसवावेत.

फसवणूक केलेल्या ऊस तोडणी मुकादमांवर तातडीने गुन्हे दाखल करून

वाहतूकदारांचे पैसे वसूल करून द्यावेत.

केंद्र व राज्य सरकारने तातडीने मराठा समाजाला अरक्षण द्यावे. तसेच धनगर, लिंगायत समाजाला त्यांच्या मागणीनुसार आरक्षण द्यावे.

रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार उसातून तयार होणाऱ्या उपपदार्थातील हिस्सा आर एस एफ 70:30 च्या सूत्रानुसार शेतकऱ्यांना देण्यात यावा.

चालू गळीत हंगामासाठी एकरकमी 3500 रुपये प्रतिटन पहिली उचल म्हणून देण्यात यावी.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT